शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मनुष्यबळ पुरविणा-या संस्थेची होणार चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 00:28 IST

महापालिकेने आऊटसोर्सिंगच्या नावावर मागील वर्षभरात खाजगी एजन्सीकडून मोठ्याप्रमाणात मनुष्यबळ घेतले. हे मनुष्यबळ प्रशिक्षित नाही. शैक्षणिक अर्हता नाही. चारशेपेक्षा अधिक कर्मचारी घेऊनही महापालिकेच्या कामकाजात कोणतीच सुधारणा नाही. मालमत्ता कराच्या वसुलीत वाढही नाही. वर्षाला सव्वाकोटी रुपये या कामावर खर्च होणार आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत केली. महापौरांनीही तीन सदस्यांची चौकशी समिती नियुक्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेने आऊटसोर्सिंगच्या नावावर मागील वर्षभरात खाजगी एजन्सीकडून मोठ्याप्रमाणात मनुष्यबळ घेतले. हे मनुष्यबळ प्रशिक्षित नाही. शैक्षणिक अर्हता नाही. चारशेपेक्षा अधिक कर्मचारी घेऊनही महापालिकेच्या कामकाजात कोणतीच सुधारणा नाही. मालमत्ता कराच्या वसुलीत वाढही नाही. वर्षाला सव्वाकोटी रुपये या कामावर खर्च होणार आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत केली. महापौरांनीही तीन सदस्यांची चौकशी समिती नियुक्त केली.सोमवारी सर्वसाधारण सभेत नगरसेवक राजू शिंदे यांनी ‘महाराणा’ सिक्युरिटी सर्व्हिसेस या संस्थेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एजन्सीने कंत्राटी कर्मचा-यांकडून पैसे घेतले, वेतन दिले नाही आदी आरोप केले. माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी एजन्सीची पूर्वी चौकशी सुरू असताना पुन्हा काम का दिले, असा मुद्दा उपस्थित केला. अफसर खान, संगीता वाघुले, नासेर सिद्दीकी यांंनी संबंधित एजन्सीचे काम थांबविण्याची मागणी केली. राजेंद्र जंजाळ यांनी अग्निशमन विभाग कर्मचा-यांकडे एकाच महाविद्यालयाचे प्रमाणपत्र असल्याचा आरोप केला. सभागृहनेते विकास जैन, उपमहापौर विजय औताडे यांनीही चौकशीची मागणी केली. महापौरांनी मुख्य लेखापरीक्षक दीपाराणी देवतराज, शहर अभियंता एस. डी. पानझडे, मुख्यलेखाधिकारी राम सोळुंके यांची समिती नियुक्त केली.नातेवाईकांचाच भरणाआऊटसोर्सिंगच्या माध्यमाने आतापर्यंत जेवढे कर्मचारी घेतले आहेत, त्यातील ९० टक्के कर्मचारी अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींचेच नातेवाईक आहेत. या सर्व कर्मचा-यांचा पगार वार्षिक सव्वाकोटी रुपये होत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी घेऊन महापालिकेला किंचितही फायदा झालेला नाही. मालमत्ता कराच्या वसुलीसाठी तब्बल १५० कर्मचा-यांची फौज उभी केली आहे. मात्र, वसुली पूर्वीप्रमाणेच सुरू आहे.महाराणा संस्थेकडून पगार दिला जात नसल्याचा आरोप सभागृहात नगरसेवकांकडून करण्यात आला. सभागृहात एक स्टेनोग्राफर बसला होता. त्याला पगार किती महिन्यांपासून झाला नाही, अशी विचारणा करण्यात आली. त्याने अडीच महिने असे उत्तर दिले. वास्तविक पाहता या कर्मचा-याची नियुक्तीच मनपाने केलेली नाही. अधिका-यांंनी परस्पर नियुक्ती करून टाकली आहे. असे ४५ पेक्षा अधिक कर्मचारी असल्याची बाब समोर आली आहे.