शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

संघाच्या प्रांत कार्यालयावर ‘शाई फेक’

By admin | Updated: July 10, 2017 00:47 IST

औरंगाबाद : भाजपच्या कार्यकर्त्यांनी भारिप- बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची गाडी अडवून काळे झेंडे दाखविल्याच्या घटनेचे पडसाद औरंगाबादेत उमटले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : भाजपच्या कार्यकर्त्यांनी भारिप- बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची गाडी अडवून काळे झेंडे दाखविल्याच्या घटनेचे पडसाद औरंगाबादेत उमटले. या घटनेच्या निषेधार्थ रविवारी बहुजन क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देवगिरी प्रांताच्या कार्यालयावर शाई व पत्रके फेकली. यावेळी भाजप आणि संघाच्या निषेधाच्या घोषणाही कार्यकर्त्यांनी दिल्या.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थळ असलेल्या मध्यप्रदेशातील महू येथे शनिवारी जनवेदना किसान संमेलनात अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर सहभागी होण्यासाठी गेले होते. संमेलनानंतर तेथील विज्ञान विद्यापीठामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धांच्या प्रतिमांचे अनावरण प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम आटोपून अ‍ॅड. आंबेडकर हे विद्यापीठाच्या बाहेर पडत होते. त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी अडवून काळे झेंडे दाखविले. अ‍ॅड. आंबेडकर यांची गाडी फोडण्याचाही प्रयत्न झाल्याचे वृत्त सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले. या घटनेचा निषेध करण्यासाठी औरंगाबादेत बहुजन क्रांती मोर्चाचे संतप्त कार्यकर्ते रविवारी दुपारी अडीच वाजता भाग्यनगरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देवगिरी प्रांत कार्यालयावर गेले. यावेळी कार्यकर्त्यांनी भाजप, संघाच्या निषेधाच्या घोषणा देत संघ कार्यालयाच्या पाटी, दरवाजावर शाई फेकली व निषेध नोंदवला. प्रकाश आंबेडकरांच्या केसालाही धक्का लागला, तर आम्ही सरसंघचालक मोहन भागवत यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा देणारी पत्रकेही तेथे भिरकावली. जोरदार घोषणाबाजीबहुजन क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीनेच संघ कार्यालयात प्रवेश केला. काही कार्यकर्त्यांनी शाईफेक केली, तर काहींनी संघ, भाजपविरोधी आणि प्रकाश आंबेडकर यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला व तेथून काढता पाय घेतला. या कार्यकर्त्यांचा समावेशसंघाच्या प्रांत कार्यालयावरील शाईफेक आंदोलनात सचिन शिंदे, कमलेश चांदणे, संदीप पट्टेकर, आनंद लोखंडे, बलवान शिंदे, संघर्ष सोनवणे, राजेश राठोड, सुरेश त्रिभुवन, प्रदीप गणकवार, सुदेश पवार, पवन पवार, विजय डोळस, रवी देहाडे आदींचा समावेश होता.तक्रारीचा निर्णय बैठकीनंतरया प्रकारानंतर सायंकाळी पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतर शाई फेकणाऱ्या कार्यकर्त्यांविरुद्ध पोलिसात तक्रार देण्याचा निर्णय घ्यायचा का नाही, ते ठरेल, अशी माहिती देवगिरी प्रांत कार्यालयाचे प्रमुख प्रशांत लिंगायत यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.पोलिसांचा गराडासंघाच्या देवगिरी प्रांत कार्यालयावर शाईफेक झाल्याचा प्रकार कळताच क्रांतीचौक पोलिसांनी कार्यालयाकडे धाव घेतली. या आंदोलनानंतर कार्यालयाजवळ पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला.