शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वैजापूर बाजार समितीच्या सभापतींवर शाई ‘हल्ला’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 00:29 IST

वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मासिक बैठकीत सोमवारी सकाळी शिवसेनेच्या नाराज संचालकांनी सभापती काकासाहेब रामकृष्ण पाटील यांच्यावर शाई हल्ला केला. त्यांच्या तोंडाला काळे फासून शेण समोर ठेवल्याच्या घटनेने बैठकीत चांगलाच गोंधळ उडाला.

लोकमत न्यूज नेटवर्कवैजापूर : वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मासिक बैठकीत सोमवारी सकाळी शिवसेनेच्या नाराज संचालकांनी सभापती काकासाहेब रामकृष्ण पाटील यांच्यावर शाई हल्ला केला. त्यांच्या तोंडाला काळे फासून शेण समोर ठेवल्याच्या घटनेने बैठकीत चांगलाच गोंधळ उडाला. सभागृहातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो काढून सभागृहाचा भगवा रंग बदलल्याच्या कारणावरून हे राजकीय शीतयुद्ध रंगले. या घटनेमुळे तालुक्यात बाबा विरुद्ध वाणी असा संघर्ष पुन्हा पेटला आहे.वैजापूर बाजार समितीच्या सभागृहात सोमवारी मासिक सभा होती. सकाळी अकरा वाजता सभा सुरू होताच सेनेचे संजय निकम व इतर संचालकांनी सभागृहातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो का काढला, तसेच सभागृहाचा भगवा रंग का बदलला, या कारणावरून सभापती काकासाहेब पाटील यांना आक्रमक शैलीत जाब विचारण्यास सुरुवात केली.त्यामुळे काकासाहेब पाटील यांनी सुद्धा सेनेच्या संचालकांना अरेरावीची भाषा वापरण्यास सुरुवात केल्याने बैठकीत गोंधळ सुरुझाला.त्यावेळी संजय निकम यांचे सुपुत्र अजिंक्य याने हातात काळ्या शाईची बाटली सभापती काकासाहेब पाटील यांच्या अंगावर ओतली तसेच सेनेच्या काही संचालकांनी पाटील यांच्या तोंडाला काळे फासून धक्काबुक्की केली. एवढेच नव्हे तर सभापतींसमोर शेणही ठेवल्याने वातावरण चांगलेच तापले.या घटनेनंतर वैजापूर पोलिसांनी मध्यस्थी करत संचालकांना समज देऊन हे प्रकरण मिटवले.