शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘शुभकल्याण’च्या फसवणूक झालेल्या बिडकीनमधील ठेवीदारांचे उपोषण सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 00:34 IST

बिडकीन येथील शुभकल्याण मल्टिस्टेट को. आॅप सोसायटीच्या बिडकीन शाखेतील फसवणूक झालेल्या ठेवीदारांनी सोमवारपासून कळंब येथील शंभू महादेव साखर कारखान्यासमोर उपोषण सुरु केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबिडकीन : येथील शुभकल्याण मल्टिस्टेट को. आॅप सोसायटीच्या बिडकीन शाखेतील फसवणूक झालेल्या ठेवीदारांनी सोमवारपासून कळंब येथील शंभू महादेव साखर कारखान्यासमोर उपोषण सुरु केले आहे.बिडकीन येथे प्रस्तावित डिएमआयसीमुळे अनेक राष्ट्रीयीकृत व सहकारी बँका,प् ातसंस्था, मल्टीस्टेट अशा अनेक शाखा बिडकीन येथे सुरु झाल्या आहेत. त्यातीलच हावरगाव ता. कळंब येथील शुभकल्याण मल्टीस्टेट को.आॅप.सोसायटीनेही आपली शाखा येथे सुरु करुन ठेवीदारांच्या ठेवी जमा केल्या. सदरील ठेवीदारांना सुरुवातीला व्याज वेळेवर मिळाले, परंतु नोव्हेंबर २०१६ पासून व्याज मिळणे बंद झाल्यामुळे तसेच सदरील मल्टीस्टेटचे संस्थापक व्याज व मुद्दल देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे लक्षात येताच जवळपास १० ते १५ ठेवीदारांचे ४२ लाख रुपये शुभकल्याण मल्टीस्टेटमध्ये गुंतल्यामुळे ठेवीदार हवालदिल झाले आहेत. या सर्वांनी मिळून २१ जुलै २०१७ रोजी बिडकीन पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. परंतु त्याचा अजून काहीही तपास न लागल्यामुळे वयोवृद्ध ठेवीदार बळवंत पिराजी सोकटकर, भुजंगराव लक्ष्मण कवडे, सुभाष रावसाहेब लंभाडे, राजू युवराज पाटील, संभाजी रावसाहेब लंभाडे, दिनेश धनराज बोरसे, मुरलीधर विठ्ठल वाघ, भीवसन मारुती शिंदे, प्रकाश मोहन धर्मे, केशव कारभारी पाबळे, भगवान जाधव, लक्ष्मण वारगुळे व कवडे तसेच सदरील मल्टिस्टेटचे व्यवस्थापक रवींद्र पावटेकर हेही सदरील मल्टीस्टेटच्या संस्थापक अध्यक्षांच्या साखर कारखान्यासमोर उपोषणास बसले आहेत. याबाबत त्यांनी चेअरमन शुभकल्याण मल्टीस्टेट हावरगाव, पोलीस निरीक्षक कळंब, पोलीस अधीक्षक उस्मानाबाद, जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद, पोलीस निरीक्षक बिडकीन, पोलीस आयुक्त कार्यालय औरंगाबाद, जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद व मुख्यमंत्र्यांना उपोषणास बसणार असल्याचे निवेदन दिले आहे. तसेच सोबत ठेवीदारांची यादी व संचालक मंडळाची यादीही जोडली आहे.जास्त व्याजाच्या आमिषामुळे वृद्ध, गोरगरिबांची फसगतशुभकल्याण मल्टीस्टेटमध्ये वयोवृद्ध व गोरगरिबांच्या ठेवी गुंतल्या असून जास्तीच्या व्याजाचे आमिष दाखवून त्यांना फसविण्यात आल्यामुळे बिडकीन व परिसरातील ठेवीदार हैराण झाले आहेत तर वयोवृद्ध बळवंत पिराजी सोकटकर म्हणाले की, माझे जवळपास दहा लाख व व्याज गुंतल्यामुळे व सतत पैशाच्या चिंतेत मला मधुमेह झाला आहे. माझ्या जीवितास काही झाले तर यास शुभकल्याण मल्टीस्टेटचे चेअरमन व संचालक मंडळ जबाबदार असल्याचे सांगितले. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांच्यावर उपोषणाची वेळ आल्यामुळे त्यांचे कुटुंबही चिंतेत पडले आहे.