शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महागाईत खाद्यतेलाचा उडाला भडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:03 IST

औरंगाबाद : पेट्रोल, डिझेल व गॅस दरापाठोपाठ खाद्यतेलाच्या किमतीही वधारल्या आहेत. परिणामी महागाईचा भडका उडाला असून, पहिल्यांदाच सूर्यफूल तेलाचे ...

औरंगाबाद : पेट्रोल, डिझेल व गॅस दरापाठोपाठ खाद्यतेलाच्या किमतीही वधारल्या आहेत. परिणामी महागाईचा भडका उडाला असून, पहिल्यांदाच सूर्यफूल तेलाचे प्रतिलिटर दर दीडशेपार गेले आहेत.

शेंगदाणा तेल १५० ते १५५ रुपये, सूर्यफूल तेल १४५ ते १५२ रुपये, सोयाबीन तेल १२५ रुपये, सरकी व पामतेल १२० रुपये प्रतिलिटर हे भाव वाचून ग्राहकांचे डोळे पांढरे होत आहेत. अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच जनता एवढ्या महागात तेल खरेदी करत आहे. मागील आठवडाभरात लिटरमागे पाच रुपयांनी खाद्यतेलात भाववाढ झाली आहे.

एरवी शेंगदाणा तेल व सूर्यफूल तेलाच्या किमतीमध्ये ३० ते ४० रुपयांची तफावत असे; पण सूर्यफूल तेलास एवढा भाव चढला की, शेंगदाणा तेलाच्या किमतीत ते विकले जात आहे.

खाद्यतेलाच्या वाढत्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी शासनाने खाद्यतेलावरील आयात शुल्कात १० टक्क्यांनी कपात केली आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात पामतेलाच्या किमती वाढत आहेत. यामुळे या शुल्क कपातीचा परिणाम जाणवला नाही.

दुसरीकडे सोयाबीनवर प्रकिया करणाऱ्या उद्योगाकडून सोयाबीनला मागणी वाढल्याने सोयाबीनचे भावही वाढत आहेत. त्याचा परिणाम अन्य खाद्यतेलांवर होत आहे. नवीन करडई बीची आवक सुरू झाली असून, पुढील महिन्यात करडई तेलाचे भाव कमी होतील, अशी शक्यता जगन्नाथ बसय्ये यांनी वर्तवली आहे.

चौकट

खाद्यतेल विक्रीत घट

खाद्यतेलाच्या किमती वाढल्याने एकीकडे विक्रेत्यांचा लागत खर्च वाढला आहे, तर दुसरीकडे ग्राहकांनी हात आखडता घेतल्याने खाद्यतेलाची विक्री ३० ते ४० टक्क्यांनी घटली आहे.

खाद्यतेल किमती (लिटर) किमती

फेब्रुवारी। मार्च

शेंगदाणा तेल। १५० रु. १५५ रु.

सूर्यफूल तेल १४० रु. १५२ रु.

सोयाबीन तेल १२० रु. १२५ रु.

पामतेल ११५ रु. १२० रु.

सरकी तेल ११५ रु.। १२० रु.