औरंगाबाद : वीज दरात आणखी वाढ केल्यास महाराष्ट्रातील उद्योग परराज्यांत जातील, अशी भीती मराठवाडा असोसिएशन आॅफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरने (मसिआ) व्यक्त केली आहे.वीज दरात वाढ करण्याच्या महावितरणच्या प्रस्तावावर विद्युत नियामक आयोगाने नुकतीच जनसुनावणी घेतली. ‘मसिआ’चे अध्यक्ष विजय लेकुरवाळे यांनी याप्रसंगी वीजदर वाढीस कडाडून विरोध केला. संभाव्य वीजदर वाढ उद्योगांसाठी कशी अन्यायकारक आहे, हे स्पष्ट करणारे निवेदनही आयोगाकडे सादर करण्यात आले.परराज्यांच्या तुलनेत सध्या महाराष्ट्रातील वीजदर २५ ते ३५ टक्क्यांपेक्षा जास्त आहेत. वीजदर वाढीला परवानगी दिल्यास शेजारील राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील वीज प्रचंड महागडी आहे. त्यामुळे अनेक लघु- मध्यम उद्योग नाईलाजाने परराज्यांत जातील. राज्य सरकारच्या महसुलात घट होण्याबरोबरच रोजगाराचा प्रश्नही यामुळे निर्माण होईल, असे ‘मसिआ’चे म्हणणे आहे. इंधन अधिभार जास्तीत जास्त २० टक्क्यांपर्यंत आकारण्याची मर्यादा असताना महावितरणने त्यात वेळोवेळी वाढ केली आहे.
...तर उद्योग परराज्यांत जातील!
By admin | Updated: August 1, 2016 00:07 IST