शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक वसाहतीतील हरीत पट्टे गायब...!

By admin | Updated: April 6, 2017 23:40 IST

जालना : जालना अतिरिक्त औद्योगिक वसाहतीच्या दुसऱ्या टप्प्यात औद्योगिक विकास महामंडळाने पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये, यादृष्टिने काही जागा हरित पट्टे म्हणून जाहीर केल्या होत्या.

जालना : जालना अतिरिक्त औद्योगिक वसाहतीच्या दुसऱ्या टप्प्यात औद्योगिक विकास महामंडळाने पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये, यादृष्टिने काही जागा हरित पट्टे म्हणून जाहीर केल्या होत्या. पैकी प्लॉट नं. एफ-११ परिसरातील १५ मिटर रुंदीचा हरित पट्टा गायब असून, तेथे संरक्षक भिंत उभारुन पट्टाच ताब्यात घेण्याचा प्रयत्न असल्याचे चित्र आहे.वाढत्या प्रदूषणाला आळा घालणे किंवा त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने प्रदूषण नियंत्रण मंडळ हे स्वतंत्र खाते सुरु केलेले आहे. या मंडळ पर्यावरण तज्ज्ञांनी केलेल्या सूचनांनुसार सरकार पर्यावरण पूरक योजना राबवित असते. त्याच अनुषंगाने जालना शहरात दुसऱ्या टप्प्यातील औद्योगिक वसाहतीची मुहूर्तमेढ रोवली जात असताना काही पर्यावरण पूरक नियम घालून देण्यात आले. हरित पट्टे हा त्यातीलच एक भाग. दुसऱ्या टप्प्याचे क्षेत्र हे १२३.४६ हेक्टर जमीन आहे. पैकी जवळपास १५ जागांवर काही मोकळे भूखंड वा उद्याने विकसीत करुन पर्यावरणाचा समतोल राखायचा, हा त्यामागील उद्देश. औद्योगिक वसाहतीतील कामगारांचे आरोग्य सुस्थितीत रहावे हाही त्यामागील एक हेतू आहे. क्रीडा असो वा सार्वजनिक कार्यक्रम यासाठी या जागा राखीव ठेवण्याचा उद्देश आहे. परंतु काही उद्योजकांनी संबंधित अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करुन या जागाच ताब्यात घेण्याचा प्रयत्न चालवला आहे. या प्रकाराला वेळीच आळा घातला गेला नाही तर या हरित पट्ट्यांचाच श्वास गुदमरण्याची शक्यता अधिक आहे. अधिकारी आणि संरक्षक भिंत बांधून भूखंड हडप करणाऱ्याविरुध्द तात्काळ कायदेशीर कार्यवाही प्रस्तावित करणे गरजेचे आहे. यासंदर्भात एमआयडीसीचे क्षेत्रिय अधिकारी वायाळ म्हणाले की, सध्या दुसऱ्या टप्प्यातील राखीव भूखंड वा हरीत पट्ट्यांची निश्चित माहिती पाहणी करुन देतो, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)