औरंगाबाद : लोकमतचे ‘एडिटर इन चीफ’ राजेंद्र दर्डा यांच्या वाढदिवसानिमित्त दि. २० नोव्हेंबर रोजी ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचा हरिकीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. गजानन महाराज मंदिराशेजारी, कडा आॅफिस मैदान, जवाहर कॉलनी रोड येथे सायं. ६ ते ९.३० या वेळेत हा हरिकीर्तन सोहळा संपन्न होईल. कीर्तनाच्या आधी ह.भ.प. कुटे महाराज ( बीड) यांचा भारुडाचा कार्यक्रम होईल. हरिकीर्तन सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजक बबन डिडोरेपाटील, गणेश डिडोरे, शंकर मात्रे, रमेश दिसागज, भिकनराव मात्रे, वामनराव ओळेकर, दिलीप तिपणे, भानुदास जाधव, साहेबराव म्हस्के, रमेश गेंदे, दादासाहेब तांदळे, सचिन गुगळे, सुरेश चव्हाण, राहुल चव्हाण, अमित शिंदे, राजू जोशी, विशाल डिडोरे, राहुल कोलते, बाबासाहेब देवकाते, ठाकरेमामा, कपिल नागोडे, अजय डिडोरे, संदीप बनसोडे व भानुदासनगर सहकारी मित्रमंडळातर्फे करण्यात आले आहे.
राजेंद्र दर्डा यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी इंदोरीकर महाराजांचे कीर्तन
By admin | Updated: November 19, 2014 01:00 IST