शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

सफाईसाठी लवकरच इंदौर पॅटर्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 00:50 IST

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशनमध्ये मागील वर्षी औरंगाबाद शहराचा क्रमांक २९९ वा आला होता. यंदाही जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात केंद्राचे एक पथक शहरातील साफसफाईचा आढावा घेण्यासाठी येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशनमध्ये मागील वर्षी औरंगाबाद शहराचा क्रमांक २९९ वा आला होता. यंदाही जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात केंद्राचे एक पथक शहरातील साफसफाईचा आढावा घेण्यासाठी येणार आहे. मागील वर्षी इंदौर शहराने देशभरात अव्वल क्रमांक मिळविला होता. त्याच धर्तीवर औरंगाबाद शहरातही साफसफाई करण्याचा मानस महापौर नंदकुमार घोडेले यांनी व्यक्त केला. प्रत्येक घरातून कचरा उचलण्यासाठी खाजगी एजन्सीची मदत घेण्यात येणार आहे. त्यासाठी सीएसआर फंड उभा करण्यात येईल.शहरातील कचरा प्रश्नावर महापालिकेला लवकरात लवकर अंतिम निर्णय घ्यावा लागणार आहे. नवी मुंबई महापालिकेने ज्या पद्धतीने वर्षानुवर्षे पडलेला कचरा नष्ट केला त्याच पद्धतीने नारेगाव येथील २० लाख टन कचरा नष्ट करण्याचा प्रयत्न मनपा करणार आहे. नारेगाव येथील शेतकºयांनी मनपाला फक्त तीन महिने कचरा टाकण्याची मुभा दिली आहे. ही मुदत आता संपत आल्याने मनपाला त्वरित निर्णय घेणे गरजेचे आहे. पुन्हा शेतकºयांनी आंदोलनाचे शस्त्र उपसले तर मनपाची भयंकर कोंडी होणार आहे. कचरा नष्ट करण्यासाठी एजन्सीचा शोध घेण्यात येत आहे.दरम्यान, महापौरांसह पदाधिकाºयांनी मंगळवारी उद्योगपती राम भोगले यांची भेट घेऊन शहरातील कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी काय करता येईल, याबाबत चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांना माहिती देताना महापौर म्हणाले की, भोगले यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली. दोन दिवसांत महापालिका शहरातील कचºयावर प्रक्रिया करणे, वाहतूक, कचºयाचे डोअर टू डोअर कलेक्शन करणे यासाठी देशपातळीवरील इच्छुक संस्थांकडून प्रस्ताव मागविणार आहे. महापालिकेने यापूर्वी साफसफाईचे खासगीकरण करून रॅम्की कंपनीला नियुक्त केले होते. नगरसेवकांच्या वाढत्या तक्रारीनंतर कंपनीचे काम बंद करण्यात आले.सीएसआर फंडसाठी बैठक; कचºयापासून खत व इंधन निर्मितीचा पर्यायमहापौर घोडेले, सभापती गजानन बारवाल, सभागृहनेते विकास जैन, नगरसेवक राजू वैद्य, नगरसेविका शिल्पाराणी वाडकर, शहर अभियंता एस. डी. पानझडे, कार्यकारी अभियंता डी. पी. कुलकर्णी यांनी उद्योगपती भोगले यांची भेट घेतली. भोगले यांनी प्रत्येक वॉर्डात किंवा प्रभागात कचºयावर मशीनद्वारे प्रक्रिया करून ओल्या कचºयापासून खत व सुक्या कचºयापासून इंधननिर्मितीचा पर्याय मांडला.दोन ते अडीच टन कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी सुमारे २५ लाखांचे मशीन उपलब्ध आहेत. त्यासाठी महापालिकेला पाणी, कर्मचारी व लाइटची व्यवस्था करावी लागेल. मशीन खरेदी करण्यासाठी विविध कंपन्यांचा सीएसआर फंड मिळविण्याचा प्रयत्न करू असे भोगले यांनी आश्वासन दिले. त्यासाठी दोन दिवसांत बैठक घेण्यात येईल, असे महापौरांनी नमूद केले.