शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
3
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
4
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
5
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
6
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
7
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
8
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
9
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
10
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा
11
'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेचा इंटरेस्टिंग किस्सा, आबांच्या भूमिकेतील दिलीप प्रभावळकर म्हणाले...
12
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
13
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
14
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
15
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video
16
वारंवार हल्ले करणाऱ्या कुत्र्यांना जन्मठेप होणार! उत्तर प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय
17
इश्क का जुनून! ६ मुलांचा ३८ वर्षीय बाप पडला १७ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात; पुढे झालं असं काही...
18
ऑनलाईन गेमचा नाद लय बेकार! ११ लाख गमावल्यानंतर सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन 
20
वाशीच्या दिशेने येणारा ट्रक उड्डाणपुलावरून कोसळला, मुंबई-पुणे महामार्गावरील घटना

ंधारूर बनली उद्योगनगरी

By admin | Updated: April 14, 2015 00:48 IST

विशाल सोनटक्के ,उस्मानाबाद महिलांनी पुढाकार घेतल्यास काय चमत्कार घडू शकतो, याचा प्रत्यय तालुक्यातील धारुर येथे पहावयास मिळतो. बचत गटाच्या माध्यमातून उद्योगाकडे वळलेल्या

विशाल सोनटक्के ,उस्मानाबादमहिलांनी पुढाकार घेतल्यास काय चमत्कार घडू शकतो, याचा प्रत्यय तालुक्यातील धारुर येथे पहावयास मिळतो. बचत गटाच्या माध्यमातून उद्योगाकडे वळलेल्या या महिला आज पिठाच्या गिरणीपासून स्वस्त धान्य दुकानापर्यंतचा कारभार मोठ्या हिंमतीने सांभाळत आहेत. विशेष म्हणजे अवघ्या २ हजार लोकवस्तीच्या या गावात सुमारे सव्वादोनशेपेक्षा अधिक महिला स्वत:च्या पायावर उभ्या राहत असून, या महिलांचा त्यांच्या कुटुंबालाही मोठा आधार मिळतो आहे.उस्मानाबाद तालुक्यातील केशेगावनजीक असलेल्या धारुरमध्ये महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून ही चळवळ उभारली गेली आहे. सद्यस्थितीत तेथे असलेल्या १६ पैकी सुमारे १४ बचत गटांच्या महिलांनी विविध उद्योग सुरु केले आहेत. जीवन ज्योती दुग्ध विकास महिला मंडळाच्या साळुबाई श्रीमंत रोकडे, मैनाबाई इंद्रजीत रोकडे, सरस्वती उबाळे, मनिषा बापूराव गायकवाड, प्रमोदिनी बिडवे, राणी सुरवसे आदी महिलांनी एकत्रीत येवून दूध संकलन केंद्र सुरु केले आहे. तर भैरवनाथ गटाच्या चंद्रकला वाघमारे यांनी फुटवेअरचे आणि लता वाघमारे यांनी किराणा दुकान उभारले आहे. दिक्षा महिला बचत गटाच्या रंजना गायकवाड, कोमल गायकवाड यांनी पिठाची गिरणी तर सुजाता गायकवाड यांनी या गटाच्या माध्यमातूनच स्वस्त धान्य दुकान चालविण्यास घेतले आहे. संगीता वाघमारे बचत गटाच्या माध्यमातून शिलाईचे दुकान टाकले आहे. याबरोबरच बांगडी विक्री, शेळी पालन, कुक्कुटपालन यासह केळी आणि आंब्याच्या बागाही या महिला अत्यंत समर्थपणे सांभाळत असल्याचे दिसून येते. जीवन ज्योती गटाच्या महिलांनी दूध संकलन केंद्र सुरु केले आहे. सध्या दुष्काळी परिस्थितीत येथे सुमारे १०० लिटर दुधाचे संकलन होत असले तरी येणाऱ्या काळात हा उद्योग वाढेल, असा विश्वास त्यांना वाटतो. केवळ दूध संकलनावरच न थांबता भविष्यात खवा, पनीर, रसगुल्ले, लस्सीसह दुग्ध प्रक्रिया उद्योग सुरु करण्यासाठी या महिलांनी प्रशिक्षणही घेतले आहे. दूधाचे संकलन करताना जनावरांचे गोठे, पाणी, चारा व्यवस्थापन आदीबाबतही त्या इतरांना मार्गदर्शन करीत आहेत. या उद्योगाच्या माध्यमातून बँक व्यवहाराबरोबरच इतर बाबींची चांगली माहिती झाल्याचे सांगत, ग्रामसभेलाही आमची आवर्जून उपस्थिती असते असे या महिलांनी सांगितले. विशेष म्हणजे या गटाच्या महिला गावातील स्वस्त धान्य दुकानही अतिशय कुशलपणे सांभाळत आहेत. पूर्वी गावात रेशन दुकान नव्हते. त्यामुळे १० किमीवरील वाडीबामणी अथवा ७ किमीवर असलेल्या केशेगावला जावे लागत होते. गावात स्वस्त धान्य दुकान सुरु व्हावे, अशी मागणी आम्ही लावून धरली. यासाठी संघर्ष केला. आज बचत गटाच्या माध्यमातूनच आम्ही हे दुकान चालवित असल्याचे सरस्वती उबाळे यांनी सांगितले. बचत गटामुळे आमच्या जीवनाला अर्थ लाभल्याचे सांगत, आज स्वकष्टाने मी माझ्या मुलीला तंत्रनिकेतनच्या अभ्यासासाठी बाहेरगावी ठेवल्याचेही त्या म्हणाल्या. उबाळे यांच्याप्रमाणेच सुवर्णा धन्यकुमार भोसले या महिलेचीही यशोगाथा आहे. पाच वर्षापूर्वी मजुरी करणाऱ्या या महिलेने २०११ मध्ये तुळजाभवानी गटाच्या माध्यमातून पावणेदोन लाखाचा खर्च करुन लाँड्री टाकली आहे. यासाठी हायड्रो आणि वॉशिंगची यंत्रे खरेदी केली. आज या लाँड्रीकडे तुळजापूरच्या सैनिकी स्कूलमधील विद्यार्थ्यांचे कपडे धुण्याचे टेंडर असून, श्री तुळजाभवानी देवस्थानसह तुळजापुरातील विविध लॉजमधील कपडे धुण्यासाठी टेम्पोने त्यांच्याकडे येतात. पूर्वी तुळजापूरला जाण्यासाठी बसच्या तिकीटाचे ५ रुपये नसायचे. मात्र या उद्योगाच्या माध्यमातून कुटुंब उभे राहिल्याचे सुवर्णा भोसले अत्यंत अभिमानाने म्हणाले.