शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ भरीव कामगिरी करेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 01:24 IST

इंग्लंडमध्ये होणाऱ्या आगामी वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघ भरीव कामगिरी करेल, अशी आशा माजी कसोटीपटू यजुरवेंद्रसिंग यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केली. १ मे रोजी शहीद भगतसिंह करंडक टी २0 क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी आज त्यांचे आगमन झाले.

ठळक मुद्देमाजी कसोटीपटू यजुरवेंद्रसिंग : हार्दिक पांड्या संघाची जमेची बाजू

औरंगाबाद : इंग्लंडमध्ये होणाऱ्या आगामी वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघ भरीव कामगिरी करेल, अशी आशा माजी कसोटीपटू यजुरवेंद्रसिंग यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केली.१ मे रोजी शहीद भगतसिंह करंडक टी २0 क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी आज त्यांचे आगमन झाले. युजरवेंद्रसिंग यांनी भारताच्या चार कसोटी सामन्यात प्रतिनिधित्व केले आहे. त्यात त्यांना फलंदाजीत प्रभाव टाकता आला नसला तरी त्यांनी बंगळुरूयेथे १९७७ साली इंग्लंडविरुद्धच्या क्षेत्ररक्षणात चमक दाखवताना पदार्पणातच विक्रमी ५ झेल घेत त्या वेळेस ठसा उमटवला. मूळ राजकोट येथील असणाºया यजुरवेंद्रसिंग यांनी ७८ कसोटी सामन्यांत ९ शतकांसह ३७६५ धावा केल्या आहेत. २१४ ही त्यांची सर्वोत्तम खेळी ठरली आहे. वर्ल्डकप स्पर्धेत सहभागी होणाºया भारतीय संघाविषयी बोलताना ते म्हणाले, ‘‘भारतीय संघाला या स्पर्धेत चांगली संधी आहे. पहिल्या चार संघांत ते असतील. तथापि, या स्पर्धेत चांगली चुरस पाहायला मिळेल. कारण अफगाणिस्तानसह सर्वच संघ तुल्यबळ आहे.’’ विराट कोहलीच्या नेतृत्व कौशल्याविषयी मात्र, त्यांनी वेगळे मत व्यक्त केले. ‘‘कर्णधार म्हणून विराट कोहली अद्याप परिपक्व झालेला नाही. तथापि, रवी शास्त्री आणि महेंद्रसिंग धोनी असल्यामुळे त्याला मदतच होईल. चौथ्या क्रमांकावरील फलंदाजीसाठी अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, सूर्यकुमार यादव यांचाही विचार करायला हवा होता. ऋषभ पंतवरदेखील अन्याय झाला आहे. तो मर्यादित षटकांच्या स्पर्धेतील तज्ज्ञ खेळाडू आहे. अम्बाती रायुडूला फक्त एका मालिकेत अपयशी ठरल्याने वगळणे हेदेखील चूक आहे.’’ भारतीय अ संघाकडून प्रभावी कामगिरी करणाºया खेळाडूंनी संघात संधी न दिल्याबद्दलही त्यांनी खंत व्यक्त केली. युवा खेळाडूंना संधीच दिली नाही, तर त्यांच्यात प्रगती कशी होईल, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. हार्दिक पांड्या हा भारतीय संघातील वनडे स्पेशालिस्ट अष्टपैलू खेळाडू आहे; परंतु त्याची महान अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांच्याशी तुलना करणे योग्य ठरणार नसल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. या वेळी शहीद भगतसिंह क्रीडा मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. उद्धव भवलकर, सचिव दामोदर मानकापे, विष्णू लोखंडे यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक अनंत नेरळकर यांनी केले.