शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

‘डीपीसी’च्या निधीसमोर ‘इंडेक्स’चा पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 01:08 IST

जिल्हा परिषदेने रस्त्यांच्या ‘पीसीआय इंडेक्स’वर अद्याप शिक्कामोर्तब केलेले नाही. असे असताना जिल्हा नियोजन समितीमार्फत ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरणासाठी पालकमंत्र्यांनी दिलेल्या जवळपास ८ कोटी रुपयांच्या खर्चाचा मोठा पेच निर्माण झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्हा परिषदेने रस्त्यांच्या ‘पीसीआय इंडेक्स’वर अद्याप शिक्कामोर्तब केलेले नाही. असे असताना जिल्हा नियोजन समितीमार्फत ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरणासाठी पालकमंत्र्यांनी दिलेल्या जवळपास ८ कोटी रुपयांच्या खर्चाचा मोठा पेच निर्माण झाला आहे.नुकत्याच झालेल्या जि.प. स्थायी समितीच्या बैठकीत ‘पीसीआय इंडेक्स’वर मोठा खल झाला होता. रस्त्यांची कामे घेण्यासाठी अगोदर ‘पीसीआय इंडेक्स’ अर्थात रस्त्यांची कामे करण्यासाठी प्राधान्यक्रम तयार करण्याचे आदेश चालू आर्थिक वर्षामध्ये शासनाने जिल्हा परिषदेला दिले आहेत. आठ महिन्यांचा कालावधी लोटला; पण अजूनही बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांकडून जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांचा प्राधान्यक्रम तयार करण्यात आलेला नाही. यामध्ये सर्वाधिक खराब रस्त्यांना मजबुतीकरणासाठी प्राधान्य देणे गरजेचे आहे. असे असताना मागील आठवड्यात पालकमंत्री रामदास कदम यांनी जि.प.च्या सर्व सदस्यांना ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण (३०५४) लेखाशीर्षाखाली जवळपास ८ कोटींचा निधी दिला आहे. सर्कलनिहाय सदस्यांच्या नावे रक्कम व रस्त्यांची यादी देण्यात आली आहे.दरम्यान, पालकमंत्र्यांनी रस्त्यांच्या कामासाठी शिवसेना सदस्यांना झुकते माप दिले आहे. सेनेच्या सदस्यांना प्रत्येकी २५ लाख रुपये, तर अन्य सदस्यांना ४ ते १५ लाखांच्या निधी दिला आहे. जिल्हा परिषदेत शिवसेना- काँग्रेस आघाडीची सत्ता आहे. आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस सदस्यांना जनसुविधा योजना आणि रस्ते विकास व मजबुतीकरण या दोन्ही योजनांमध्ये निधी देताना दुजाभाव केल्याचे स्पष्ट होत आहे. एप्रिल महिन्यात जनसुविधा योजनेंतर्गत सेनेच्याच सदस्यांना प्रत्येकी २५ लाखांचा निधी दिलेला होता. तेव्हा पालकमंत्र्यांच्या या कृतीबद्दल काँग्रेस गोटातून तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे यावेळी सर्वच सदस्यांनाही कमी-अधिक निधी दिला.