शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

टाऊनशीपसाठी स्वतंत्र प्राधिकरण

By admin | Updated: July 3, 2017 00:59 IST

जालना : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील नियोजित टाऊनशीपच्या (कृषी समृद्धी केंद्र) विकासासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाची ‘नवनगर विकास प्राधिकरण’ म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

बाबासाहेब म्हस्के । लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील नियोजित टाऊनशीपच्या (कृषी समृद्धी केंद्र) विकासासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाची ‘नवनगर विकास प्राधिकरण’ म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे टाऊनशीपमधील सुविधांचा प्रस्ताव, आराखडा व नियमावली तयार करण्याचे काम या पुढे प्राधिकरणाच्या माध्यमातून पूर्ण केले जाणार आहे. जालना तालुक्यातील जामवाडी, श्रीकृष्णनगर, गुंडेवाडी शिवारातील काही भागात नियोजित टाऊनशीप झाल्यास या परिसरात विकास कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना प्राधिकरणाची परवानी घ्यावी लागणार आहे.नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर २४ ठिकाणी सुनियोजित टाऊनशीप विकसित केल्या जाणार आहेत. टाऊनशीपसाठी अधिसूचित जमिनीवर औद्योगिक, कृषी विकास, शैक्षणिक, निवासी, असे झोन तयार करण्यात येणार आहेत. सदर झोनमध्ये करावयाच्या कामांचा आराखडा, विकास कामांची नियमावली तयार करण्याचे काम नवनगर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून होणार आहे. जालना तालुक्यातील जामवाडी, गुंडेवाडी, श्रीकृष्णनगर या भागातील काही जमीन टाऊनशीपसाठी संपादित करण्याचे प्रस्तावित आहे.त्यामुळे या भागातील शेतकरी चिंताग्रस्त आहेत. सुपिक व अकृषक जमिनी जाण्याच्या भितीने शेतकऱ्यांकडून टाऊनशीपला विरोध केला जात आहे. शासनाचा नवनगर विकास प्राधिकरण स्थापन करण्याचा अध्यादेश शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे.शेतकऱ्यांना स्वत:च्या शेतात काही करायचे झाल्यास रस्ते विकास महामंडळाची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे हा अध्यादेश रद्द करण्यात यावा, अशी मागणी शेतकरी हक्क बचाव समितीचे अध्यक्ष प्रशांत वाढेकर यांनी केली आहे.