शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षेचा वधारतोय टक्का..!

By admin | Updated: April 8, 2017 23:20 IST

उस्मानाबादपोलीस ठाण्यात दाखल होणाऱ्या दोष सिद्धीेचे प्रमाण वाढावे, यासाठी पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षकांसह कन्विक्शन विभागाने केलेल्या प्रयत्नांना यश येत असल्याचे दिसत आहे़

विजय मुंडे उस्मानाबादपोलीस ठाण्यात दाखल होणाऱ्या दोष सिद्धीेचे प्रमाण वाढावे, यासाठी पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षकांसह कन्विक्शन विभागाने केलेल्या प्रयत्नांना यश येत असल्याचे दिसत आहे़ चालू वर्षात सत्र न्यायालयात चाललेल्या ४९ खटल्यांचा निकाल लागला असून, ११ प्रकरणात दोषींना शिक्षा झाली आहे़ याचे शेकडा प्रमाण २२़४४ टक्के आहे़ मार्च २०१५ पर्यंतच्या तिमाहीत १६.३६ टक्के तर मार्च २०१६ मधील तिमाहीत असलेले ५़५५ टक्क्यांचे प्रमाण वाढून २२़४४ टक्क्यांवर गेले आहे़ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांमध्ये दोष सिद्धीचे प्रमाण वाढविण्यासाठी शासनस्तनावरून वेळोवेळी सूचना देण्यात येतात़ न्यायालयात चालणाऱ्या खटल्यांवर लक्ष ठेवून पाठपुरावा करण्यासाठी कोर्ट पैरवी कर्मचारी, अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत़ तसेच समन्वयासाठी स्वतंत्र कन्विक्शन सेल कार्यरत आहे़ या विभागातून न्यायालयात चालणाऱ्या दैनंदिन केसेसबाबत कामकाज पाहिले जाते़ तसेच न्यायालयात चालणाऱ्या खटल्यांच्या अनुषंगाने साक्षीदारांना मार्गदर्शन करणे, समन्स, वॉरंट बजावणीकडे लक्ष देणे, शिक्षा लागलेल्या व सुटलेल्या केसेसचा अभ्यास करणे, गुणवत्तेवर अपीलविषयक निर्णय घेणे, दैनंदिन व माहिनेवारी अहवाल विषयक कामकाज या विभागामार्फत केले जात आहे़ जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांतर्गत दाखल प्रकरणातील दोष सिध्दतेचे प्रमाण वाढावे यासाठी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक दिपाली घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्विक्शन सेलचे सपोनि राजेंद्र बनसोडे व त्यांच्या टीमने काम सुरू केले आहे़ २०१४ मधील दोष सिद्धतेचे वार्षिक प्रमाण १२़९४ टक्के होते़ या वर्षात एकूण २०१ खटले निकाली निघाले़ यात केवळ २६ प्रकरणात शिक्षा झाली तर १७५ प्रकरणात दोष सिद्धता झाली नाही़ या वर्षात जानेवारीतील २३ व फेब्रवारीतील १० केसेसपैकी एकाही केसमध्ये शिक्षा झाली नव्हती़ उर्वरित १० महिन्यात २६ प्रकरणात शिक्षा झाली आहे़ सन २०१५ मध्ये दोष सिध्दतेचे वार्षिक प्रमाण १५़४९ टक्के होते़ या वर्षात २२६ प्रकरणे निकाली निघाली़ यात केवळ ३५ प्रकरणातील दोषींना शिक्षा झाली तर १९१ प्रकरणात दोष सिद्धता झाली नाही़ या वर्षात आॅक्टोबर महिन्यातील १९ पैकी ५ प्रकरणात शिक्षा झाली आहे़ सन २०१६ मधील दोष सिध्दतेचे वार्षिक प्रमाण केवळ ७़६९ टक्के होते़ या वर्षातील २३४ प्रकरणांपैकी केवळ १८ प्रकरणातील दोषींना शिक्षा झाली़ तर इतर १९१ प्रकरणात दोष सिद्धता झाली नाही़ जानेवारी २०१६ मधील २५ व जून २०१६ मधील २१ पैकी एकाही प्रकरणात आरोपिंना शिक्षा झाली नाही़ फेब्रुवारीत २३ पैकी २, मार्च मध्ये २४ पैकी २, एप्रिलमध्ये २२ पैकी १, मे मध्ये २४ पैकी २, जुलैमध्ये १५ पैकी १, आॅगस्टमध्ये १६ पैकी २, सप्टेंबरमध्ये १८ पैकी १, आॅक्टोबरमध्ये १७ पैकी ३, नोव्हेंबरमध्ये १२ पैकी १ तर डिसेंबर २०१६ मध्ये १७ पैकी केवळ ३ प्रकरणात दोष सिद्धी झाली होती़