शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

करमाड येथील केंद्रावर डाळिंबाची वाढली आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:04 IST

करमाड​ : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या करमाड येथील उपबाजार पेठेत डाळिंबाची आवक वाढली आहे. डाळिंबाला भावही चांगला मिळत असल्याने ...

करमाड​ : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या करमाड येथील उपबाजार पेठेत डाळिंबाची आवक वाढली आहे. डाळिंबाला भावही चांगला मिळत असल्याने शेतकऱ्यांचा ओढा करमाड बाजारपेठेकडे​ वाढत आहे. मात्र, सध्याच्या वातावरणाचा डाळिंबावर विपरीत परिणाम झाला असून, मोठ्या प्रमाणात बुरशीजन्य जीवाणूचा हल्ला झाल्याने डाळिंबाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

करमाड परिसरात डाळिंब बागांचे क्षेत्र सर्वाधिक आहे. या भागातील प्रत्येक बागायतदार शेतकऱ्यांकडे कमीत कमी तीनशे ते जास्तीत जास्त सहा हजार खोडापर्यंत डाळिंब बागा आहेत. करमाड येथे औरंगाबाद तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने सुसज्ज असे व्यापारी संकुल उभे केले आहे. दोन मोठमोठे सेल हॉल आहेत. त्यामुळे एकात डाळिंब तर दुसऱ्या सेल हॉलमध्ये टमाटे खरेदी-विक्रीचा व्यवहार चालतो. डाळिंब खरेदी-विक्रीला नुकताच प्रारंभ झाला आहे. करमाड बाजारपेठेत चांगलीच आवक​ वाढली आहे​. शनिवारी (दि २४) करमाड उपबाजारपेठेत जवळपास २२०० कॅरेट डाळिंब शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणले होते. कॅरेटला नाशिकप्रमाणेच म्हणजे अकराशे ते सोळाशे रुपये प्रति कॅरेट भाव मिळाला. दररोज रोख रक्कम मिळत असल्याने शेतकऱ्यांचा ओढा करमाडकडे वळला आहे​.

करमाड उपबाजार पेठेत येणारे डाळिंब चांगल्या दर्जाचे आहेत, येथे व्यापारी आले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना रोज नगदी पैसे मिळू लागले आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीने चांगल्या सुविधा निर्माण करून दिल्या आहेत.

- ​ भरत सोनवणे, व्यापारी

फोटो कॅप्शन

करमाड येथील उपबाजार पेठेत विक्रीस आलेल्या डाळिंबाची अशा पद्धतीने छाटणी करताना.