शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस नसल्याने तापमानात वाढ

By admin | Updated: August 7, 2014 23:33 IST

पाऊस पडत नसल्याने तापमानात वाढ होत चालली आहे.

केज: पावसाळा सुरू झाला, मात्र पाऊस नाही. ढग दाटून येतात, मात्र जोराच्या वाहत्या वाऱ्यामुळे वातावरण पुन्हा सामान्य होते. पाऊस पडत नसल्याने तापमानात वाढ होत चालली आहे. यामुळे शेतकरी व सामान्य नागरिकही पाणी नसल्यामुळे चिंतातूर झाले आहेत.जून महिन्यात पाऊस होईल, या आशेवर शेतकऱ्यांनी पेरण्या उरकून घेतल्या होत्या. पेरण्यांसाठी शेतकऱ्यांनी बँकेतून कर्ज काढले तर काही शेतकऱ्यांनी खाजगी कर्ज घेतले. मात्र पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले. त्यानंतर ७ जुलै रोजी पावसाला सुरुवात झाली. या दरम्यानच्या कालावधीत तीन-चार मोठे पाऊस पडले. याच पावसावर शेतकऱ्यांनी पुन्हा पेरण्या घेतल्या. बियाण्यांची उगवण होताच पुन्हा पावसाने दडी मारली. यामुळे उगवलेली रोपे वाचविण्याचे जणू आव्हानच शेतकऱ्यांसमोर उभे राहिले. त्यामुळे त्यांनी गावांमधून पाणी आणून रोपांना टाकले. पाऊस नसल्यामुळे केवळ शेतकरीच त्रस्त आहेत अशातला भाग नाही. सामान्य नागरिकही चिंतातूर झालेला आहे. दिवसेंदिवस पाणी समस्या बिकट बनत चालली आहे. त्याचा परिणाम आर्थिक बाबीवरही होणार असल्याचा अंदाज येत असल्यामुळे अनेकजण चिंताग्रस्त झाले आहेत. केज तालुक्यातील अनेक भागामध्ये नभ दाटून येत आहेत. मात्र वेगाने वाहत असलेल्या वाऱ्यामुळे आलेले ढग निघून जात आहेत. वातावरण पुन्हा कोरडेठाक होते. ढग नसल्याने तापमानात वाढ होत चालली आहे. महसूल कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार तापमान २८ ते ३२ अंशाच्या आसपास नोंदविले जात आहे. पावसाळ्यात तापमान २४ ते २६ अंशाच्या आसपास असते. मात्र पाऊस नसल्याने वातावरण कोरडे झाले आहे. परिणामी तापमानही वाढत चालले आहे. पाऊस झाल्यास हवेत आर्द्रता निर्माण होते. त्यामुळे उन्हाची तीव्रता वाढत नाही. यामुळे गेल्या दहा दिवसांत तापमान वाढत चालले आहे. गेल्या तीन दिवसांत तापमान ३२ अंशावर जाऊन पोहचले आहे. यावरुन तापमान वाढत असल्याचे लक्षात येते. (वार्ताहर)