शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षित प्रसूतीचा आलेख उंचावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 00:44 IST

नांदेड: जिल्ह्यात मागील चार वर्षांत संस्थापक प्रसूतीत सातत्याने वाढ होत असून हा आलेख ९० टक्क्यांवर गेला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: जिल्ह्यात मागील चार वर्षांत संस्थापक प्रसूतीत सातत्याने वाढ होत असून हा आलेख ९० टक्क्यांवर गेला आहे़ गरोदरपण व प्र्रसूतीशी संबंधित गुंतागुंतीमुळे होणाऱ्या मातांचे मृत्यू टाळण्यात नांदेड जिल्हा आघाडीवर आहे़ राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा प्रमुख उद्देश हा मातामृत्यू कमी करणे हा असून यासाठी जिल्ह्यामध्ये मातांना द्यावयाच्या विविध सेवा व योजनेमध्ये प्रगती केली आहे़ मातामृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आली़ त्यामध्ये संस्थापक प्रसूती वाढविणे, जननी शिशुसुरक्षा योजनेचा लाभ देणे, मानव विकास कार्यक्रमांतर्गत गरोदर मातांची तपासणी शिबिरे व बुडीत मजुरीचा लाभ देणे, नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत अतिजोखमीच्या मातांची काळजी व उपचार देणे, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान मिशन इंद्रधनुष्यची अंमलबजावणी करणे यााबाबतचा आढावा घेण्यात येतो़ गरोदर मातेची प्रसूती सुरक्षित होऊन बालक व मातांना कमीत कमी ४८ तास निगराणीखाली ठेवता यावे, यासाठी जिल्ह्यात डिलिव्हरी पॉर्इंटसचे बळकटीकरण करण्यात आले आहे़ त्यानुसार जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्राच्या ठिकाणी बाळंतकक्ष बांधण्यात आले आहेत़ त्याचबरोबर त्या ठिकाणी विविध सोयीसुविधाही उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत़नांदेड जिल्ह्यात मागील चार- पाच वर्षांत मातांचे मृत्यू होण्याचे प्रमाण कमी झाले आहे़ जिल्ह्यात २०११ मध्ये ४२, २०१२ मध्ये ३९, २०१४ मध्ये ५१, २०१५ मध्ये ५३ मातांचे मृत्यू झाले़ जिल्ह्याचा जननदर कमी करण्यासाठी कुटुंबकल्याण कार्यक्रम प्रभाविपणे राबविणे गरजेचे असते़ त्यानुसार नांदेड जिल्ह्यामध्ये मागील ३ वर्षांपासून सर्व आरोग्य कार्यक्रमांचे सर्व पातळीवरून प्रभाविपणे संनियंत्रण व योजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे़गरोदर मातांना द्यावयाच्या सेवामध्ये धनुर्वात प्रतिबंधक लस, लोहयुक्त गोळ्या वाटपाचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण केल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ बालाजी शिंदे यांनी सांगितले़