शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
3
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
4
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
5
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
6
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
7
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
8
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
9
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
10
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
11
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
12
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
13
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
14
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
15
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
16
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
17
प्यार तूने क्या किया! डिजिटल अफेअर्स म्हणजे काय, भारतात का लोकप्रिय होतोय रिलेशनशिप ट्रेंड?
18
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
19
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
20
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल

रेशन दुकानांची संख्या वाढवा

By admin | Updated: July 8, 2014 01:00 IST

अंबड : स्वस्त धान्य लाभार्थ्यांच्या याद्या आठ दिवसांत दुरुस्त करण्याचे, तालुक्यात स्वस्त धान्य दुकानांची संख्या वाढविण्याचे आदेश पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले.

अंबड : स्वस्त धान्य लाभार्थ्यांच्या याद्या आठ दिवसांत दुरुस्त करण्याचे तसेच सर्वसामान्यांना त्यांच्या हक्काचे नवीन रेशन कार्ड वाटप तात्काळ सुरु करावे, तसेच तालुक्यात स्वस्त धान्य दुकानांची संख्या वाढविण्याचे आदेश पालकमंत्री राजेश टोपे यांनी गायनाचार्य गोविंदराव जळगावकर नाट्यगृहात आयोजित अंबड-घनसावंगी तालुका अन्न सुरक्षा योजना आढावा बैठकीत बोलताना दिले. टोपे म्हणाले, अन्नसुरक्षा योजना अत्यंत चांगली आहे. मात्र या योजनेची अंमलबजावणी असमाधानकारक आहे. प्रशासन, स्वस्त धान्य दुकानदार, सामान्य नागरिक सर्वांनी एकत्र येऊन या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेव्दारे पुरवठा करण्यात येणाऱ्या स्वस्त धान्याबाबत सर्वात जास्त तक्रारी या लाभार्थ्यांच्या यादीबाबत आहेत. लाभार्थ्यांच्या याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर चुका झालेल्या आहेत. वास्तविक लाभार्थ्यांच्या याद्या प्रशासनाने बनविण्याची आवश्यकता होती, मात्र हे काम स्वस्त धान्य दुकानदारांवर सोपविण्यात आल्याने याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी राहिल्या. स्वस्त धान्य लाभार्थ्यांच्या याद्या आठ दिवसांत दुरुस्त करुन नवीन लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे रेशन कार्ड तात्काळ वितरित करण्यात यावेत, सुधारित याद्या सार्वजनिक ठिकाणी, तहसील कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय आदी ठिकाणी सामान्यांना पाहता येतील अशा ठिकाणी लावाव्यात, नवीन याद्या तयार झाल्यानंतर वाढीव लाभार्थ्यांचे वाढीव नियतन स्वस्त धान्य दुकानदारांना पोहोचविण्याची जबाबदारी प्रशासनाची राहिल, दुकानदारांना तात्काळ वाढीव नियतन देण्यात यावे, अन्नसुरक्षा योजना सर्वसामान्य गरीब जनतेच्या पोटाची खळगी भरण्यासाठी असल्याची जाणीव प्रशासनातील अधिकारी, स्वस्त धान्य दुकानदार आदींनी ठेवणे गरजेचे आहे. यासाठी दक्षता समिती, तलाठी, गावचे सरपंच आदींनी परिश्रम घेण्याची गरज आहे. हक्काचे धान्य मिळत नसल्याने सर्वसामान्यांमध्ये असंतोष निर्माण होतो व त्याची झळ लोकप्रतिनिधींना सहन करावी लागते. स्वस्त धान्य दुकानदारांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावावे अन्यथा प्रशासनाने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. आठवड्यातून किमान तीन दिवस उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी ग्रामीण भागात जाऊन स्वस्त धान्य वाटपावर लक्ष ठेवावे. बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.निसार अहमद देशमुख, उपविभागीय अधिकारी डॉ.श्रीमंत हारकर, अंबडचे तहसीलदार महेश सावंत, घनसावंगीचे तहसीलदार अभय चव्हाण, जि.प.सदस्य अ‍ॅड.संजय काळबांडे, दत्ता वाघ, नंदकुमार देशमुख, तात्यासाहेब चिमणे, मधुकर देशमुख, कपिल राऊत, रमेश पैठणे, रामदास कुरणकर, शिवाजी मस्के, नगरपालिका मुख्याधिकारी राहुल सूर्यवंशी, अंबडचे पोलीस निरीक्षक मुकुंद आघाव, गोंदीचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड आदींची उपस्थिती होती. (वार्ताहर)नवीन रेशनकार्ड तात्काळ द्यावेनवीन रेशनकार्ड वाटपाची प्रक्रिया थांबविण्यात आल्याच्या अनेक तक्रारी आपणास प्राप्त झाल्या आहेत. नवीन रेशनकार्ड वाटपाची प्रक्रिया तहसील कार्यालयामध्ये का थांबविण्यात आली आहे, हे समजत नाही. नवीन रेशनकार्ड देण्यासाठी प्रशासनाने तयारी करावी. धान्य तस्कर दुकानदारांच्या सहाय्याने सामान्यांच्या हक्काचे धान्य मुंबई, पुणे आदी मोठया शहरांमध्ये काळया बाजारात पाठवितात. काळया बाजारात धान्य पाठविणे, चढ्या भावाने धान्य विक्री करणे कदापी खपवून घेतले जाणार नाही, अशा दुकानदार तस्करांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश यावेळी पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले.