शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ खुरट्या पुलाची उंची वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:27 IST

उस्मानपुरा ते सातारा रस्त्यातील नदीवरील पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : उस्मानपुरा ते सातारा रस्त्यातील नदीवरील कमी उंचीच्या पुलावरून पुरात वाहून गेल्यामुळे चार दिवसांपूर्वीच एका तरुणाचा बळी गेला. त्यामुळे मनपाने या पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.सातारा व परिसरातील विविध वसाहतींना हा जवळचा मार्ग असल्याने याच रस्त्याने २४ तास गर्दी असते. या पुलावरून बाराही महिने पाणी वाहत असल्याने त्या पाण्यातून चालक वाहने पळवितात. रस्त्यावरून वाहणारे पाणी नागरिकांना कधी शंका आणणारे वाटले नाही. त्याविषयी कुणी प्रशासनाकडे रीतसर तक्रारदेखील केली नाही. त्यामुळे बिनबोभाटपणे रस्त्यावरून नागरिकांची ये-जा सुरू असते; परंतु नुकताच दुचाकीस्वार वाहून त्याचा बळी गेल्याने वाहनचालक आता पाण्यातून जाण्याची हिंमत करण्याचे टाळत आहेत.नाला ओलांडून शाळा, महाविद्यालये, हॉस्पिटल, मंगल कार्यालय तसेच सातारा खंडोबा देवस्थान असल्याने दररोज शहरातून येणाºयांच्या गर्दीत खंड पडलेला नाही. महानगरपालिका हद्दीत असूनदेखील पुलासाठी काही उपाययोजना केल्या नसल्याने अपघाताचा प्रकार घडला आहे.जनतेसाठी मनपाने पाऊल उचलावे...सातारा व परिसरातील नागरिकांना शहरात जाण्यासाठी हा अत्यंत जवळचा मार्ग असून, पंचक्रोशीतील नागरिक याच रस्त्याचा सर्रास वापर करीत आहेत; परंतु अपघाताची घटना घडल्याने नागरिकांतून भीती व्यक्त होत आहे. याच रस्त्यावर रुग्णालय असल्याने शहरातून बहुतांश नागरिक संग्रामनगर पुलाचा वापर टाळून उस्मानपुरा ते सातारा असा जुन्या रस्त्याचाच वापर करतात. महापालिका हद्दीत हा रस्ता मनपा स्थापनेपासून आहे; परंतु पूल बांधण्यासाठी पावले उचलली नसल्याची खंत माजी पंचायत समिती सदस्य जावेद पटेल यांनी व्यक्त केली.महानगरपालिकेत मागणी लावून धरणार...जवळचा मार्ग असल्याने सातारा व तांडा परिसरातील नागरिक उस्मानपुरा रेल्वेगेटपासून एमआयटी सातारा रस्त्याचा वापर करतात. शहरातील ड्रेनेजचे सांडपाणी याच नाल्यातून बाराही महिने वाहत असते. विद्यार्थी, नागरिकांना या रस्त्याने जाताना असुरक्षितता निर्माण झाली आहे. त्याकरिता मनपाच्या वतीने नाल्यात पूल बनवावा, अशी मागणी सातारा वॉर्डाच्या नगरसेविका सायली जमादार यांनी केली आहे.