शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

ताप रूग्णांत वाढ

By admin | Updated: September 20, 2014 00:06 IST

नांदेड : वातावरणातील बदल व ठिकठिकाणी साचलेल्या पाण्याच्या डबक्यामुळे शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.

नांदेड : वातावरणातील बदल व ठिकठिकाणी साचलेल्या पाण्याच्या डबक्यामुळे शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. गत आठ महिन्यांत डेंग्यूचे २२ रूग्ण पॉझिटीव्ह आढळले आहेत़ तर साथीच्या रोगांनी नागरिक त्रस्त आहेत़ यासंदर्भात मनपाच्या आरोग्य विभागाकडून उपाययोजना राबवण्यात येत असल्याचा दावा करण्यात येत असला तरी अनेक भागात अळीनाशक औषधी फवारणी करण्यात आली नाही़ शहरात स्वच्छतेच्या कामाचा बोजवारा उडाल्याने ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत़ तुंबलेल्या नाल्यामुळे रस्त्यावर घाण पाणी येत आहे़ त्यामुळे डासांची उत्पती निर्माण होवून साथरोगांना निमंत्रण मिळत आहे़ अनेक भागातील लहान मुले, जेष्ठ नागरिकांना साथीचे आजार होत आहेत़ ताप, सर्दी, खोकला या आजाराने नागरिक त्रस्त आहेत़ गेल्या काही महिन्यापासून डेंग्यूने डोके वर काढले आहे़ आतापर्यंत २२ रूग्ण पॉझिटीव्ह आढळल्याचे नोंद शासकीय रूग्णालयात आहे़ यातील काही रूग्ण बरे झाले असून एका रूग्णावर उपचार सुरू असल्याची माहिती मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ़ मीरा कुलकर्णी यांनी दिली़ त्या म्हणाल्या, सध्या वातावरणातील बदलामुळे साथीचे रोग आढळून आले आहेत़ महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरात हिवताप व डेंग्यू आजारांचा प्रचार टाळण्यासाठी प्रभागनिहाय अळीनाशक औषधी फवारणी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे़ डेंग्यूचे रूग्ण आढळलेल्या भागात धुर व औषधी फवारणी करण्यात येत आहे़ तसेच कंटेनर पाहणी मोहीमही सुरू आहे़ स्वयंसेवक घरोघर भेटी देवून नागरिकांच्या घरातील पाणीसाठे तपासणी करत आहेत़ घरातील कुलर, टायर, सिमेंटच्या पाण्याच्या टाक्या या ठिकाणी पाण्याचे साठे आहेत़ त्यामुळे अशा पाणीसाठ्यावर डासांची निर्मिती होवून साथीचे आजार बळावत आहेत़ यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे़ डॉ़ प्रमोद अंबाळकर म्हणाले, शहरात सध्या विषाणूजन्य आजारांचे रूग्ण वाढले असून गॅस्ट्रो, डेंग्यू, कावीळ, मलेरीया आदी आजारामुळे रूग्णालयात गर्दी होत आहे़ विशेषत: ग्रामीण भागातील रूग्णांची संख्या अधिक असून शहरातील अविकसीत भागात डेंग्यूचे रूग्ण वाढले आहेत़ महिन्यातून दोन, तीन रूग्ण डेंग्यूचे आढळत आहेत़ या रूग्णांना शासकीय रूग्णालयात पाठविण्यात येत आहे़ (प्रतिनिधी)