शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकांच्या मानधनात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 01:09 IST

महाराष्टÑ शासनाने १५ जुलै रोजी राज्यातील सर्व महापालिकांमधील नगरसेवकांच्या मानधनात घसघशीत वाढ करण्याचा निर्णय घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महाराष्टÑ शासनाने १५ जुलै रोजी राज्यातील सर्व महापालिकांमधील नगरसेवकांच्या मानधनात घसघशीत वाढ करण्याचा निर्णय घेतला. औरंगाबाद महापालिकेतील नगरसेवकांना पूर्वी साडेसात हजार रुपये मानधन मिळत होते. आता शासन आदेशानुसार दहा हजार रुपये मानधन मिळणार आहे. मानधन अदा करण्यासाठी स्थायी समितीची मंजुरी आवश्यक असल्याने याच महिन्यात प्रशासनाकडून ठराव ठेवण्यात आला आहे. बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होणार आहे.सभापती गजानन बारवाल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत मानधनवाढीचा ठराव ठेवण्यात आला आहे. नगर विकास विभागाने १५ जुलै रोजी राज्यातील सर्व महानगरपालिकेतील नगरसेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा अध्यादेश जारी केला आहे. या आदेशानुसार बृहन्मुंबई वगळता राज्यातील इतर मनपातील सदस्यांच्या मानधनात वर्गवारीनुसार वाढ केली आहे. औरंगाबादेत नगरसेवकांना साडेसात हजारांऐवजी आता दहा हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. शासन आदेशाचा संदर्भ देत मनपा प्रशासनाने १५ जुलैपासून हे वाढीव मानधन देण्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायी समितीसमोर ठेवला आहे.सध्या मनपात ११३ लोकनियुक्त आणि ५ स्वीकृत असे एकूण ११८ नगरसेवक आहेत. या नगरसेवकांच्या मानधनावर आतापर्यंत वर्षाकाठी १ कोटी ८ लाख रुपये खर्च होत होते. आता हा खर्च १ कोटी ४४ लाख रुपये इतका होणार आहे. याशिवाय पालिकेतील पदाधिकारी, विषय समिती सभापती, प्रभाग समिती सभापती यांच्या मानधनावरही सुमारे ३६ लाख रुपयांचा खर्च होत असल्याचे सूत्रांनी नमूद केले.