शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

५६ कोरोना रुग्णांची वाढ, ६ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:21 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाच्या ५६ रुग्णांची भर पडली, तर उपचार पूर्ण झालेल्या ९६ रुग्णांना सुटी देण्यात आली, तसेच ...

औरंगाबाद : जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाच्या ५६ रुग्णांची भर पडली, तर उपचार पूर्ण झालेल्या ९६ रुग्णांना सुटी देण्यात आली, तसेच जिल्ह्यातील ६ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४४,१८० एवढी झाली आहे. यातील ४२,२७० रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत, तर १,१६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ७४४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ५६ रुग्णांत मनपा हद्दीतील ४५, ग्रामीण भागातील ११ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ७१ आणि ग्रामीण भागातील २५, अशा ९६ रुग्णांना गुरुवारी सुटी देण्यात आली. पडेगावातील ५२ वर्षीय पुरुष, हर्सूल पिसादेवी रोड येथील ६१ वर्षीय पुरुष, चौका येथील ६० वर्षीय पुरुष, एन-११ नवजीवन कॉलनी येथील ६४ वर्षीय पुरुष, द्वारकानगरातील ७२ वर्षीय स्त्री, अजबनगरातील ७० वर्षीय स्त्री या कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण

उस्मानपुरा १, रेल्वे स्टेशन १, छावणी परिसर १, एन-३ सिडको १, उल्कानगरी १, बीड बायपास १, रामनगर २, पहाडसिंगपुरा १, रेल्वे स्टेशन परिसर २, मछली खडक १, आविष्कार कॉलनी १, ईटखेडा १, अयोध्यानगर १, मध्यवर्ती बसस्थानक परिसर १, हरिप्रसादनगर १, एन-११ सिडको १, हर्सूल १, शाहनूरवाडी १, अन्य २५.

ग्रामीण भागातील रुग्ण

मुधलवाडी, पैठण १, अन्य १०.