औरंगाबाद : जिल्ह्यात सोमवारी कोरोनाच्या ५४ रुग्णांची भर पडली, तर उपचार पूर्ण झालेल्या १४८ रुग्णांना सुटी देण्यात आली. तसेच जिल्ह्यातील २ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४४,४२९ एवढी झाली आहे. यातील ४२,७९१ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत, तर १,१७५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ४६३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ५४ रुग्णांपैकी मनपा हद्दीतील ५१, ग्रामीण भागातील ३ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील १३५ आणि ग्रामीण भागातील १३ अशा १४८ रुग्णांना सोमवारी सुटी देण्यात आली. चिकलठाणा येथील ७४ वर्षीय पुरुष आणि यशश्री कॉलनी, सिडकोतील ४४ वर्षीय पुरुष कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रुग्ण
कैलासनगर १, ठाकरेनगर १, मुकुंदवाडी २, गादिया पार्क १, मायानगर, एन दोन १, पडेगाव १, एमजीएम मुलांचे वसतिगृह परिसर १, अन्य ४३.
ग्रामीण भागातील रुग्ण
वाळूज १, गुड ईअर कंपनी परिसर १, वळदगाव १.