शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
4
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
5
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
6
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
7
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
8
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
9
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
10
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
11
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
12
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
13
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
14
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
15
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
16
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
17
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
18
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
19
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
20
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
Daily Top 2Weekly Top 5

नरेगात अपूर्ण कामांची जंत्री

By admin | Updated: June 23, 2017 23:23 IST

हिंगोली : जिल्ह्यातमग्रारोहयोची कामे वेळेत सुरू न केल्याचे परिणाम दरवर्षी भोगावे लागतात.

हिंगोली : जिल्ह्यातमग्रारोहयोची कामे वेळेत सुरू न केल्याचे परिणाम दरवर्षी भोगावे लागतात. अर्धवट कामे ठेवण्याचे प्रमाण वाढत जात असल्याने नंतर अशा कामांवरील शासन खर्च वायाही जातो. यंदाही तब्बल ३६९८ कामे अर्धवट असल्याचे दिसून येत आहे.दरवर्षीच नोव्हेंबरनंतर मग्रारोहयोतील कामांना गती देणे अपेक्षित असताना एप्रिल-मे महिन्यात प्रशासनाला जाग येते. तोपर्यंत लोकप्रतिनिधी, शासन असा सगळीकडून रेटा वाढलेला असतो त्यामुळे हे सोपस्कार पूर्ण करायचे असतात. त्यात कामेही भरमसाठ सुरू केली जातात. ती पूर्ण कधी होतील, याचा साधा अंदाजही बांधला जात नाही. शिवाय मजुरांना काम उपलब्ध करून देणे अनिवार्य असल्याने ही कामे सुरू करावीही लागतात. औंढा तालुक्यात ३२१0, वसमत-११९१, हिंगोली-३७१६, कळमनुरी-२0८३, सेनगाव-४७३३ अशी सुरू झालेल्या कामांची संख्या १४९३३ एवढी होती. यापैकी ६८५४ कामे पूर्ण झाली. तर हे प्रमाण ५४ टक्के आहे. सर्वाधिक ६२ टक्के कामे वसमतमध्ये पूर्ण झाली आहेत. तर अपूर्ण राहिलेली ३१५६ कामे रद्द करावी लागली. तरीही औंढा-१0१३, वसमत-१८२, हिंगोली-८३५, कळमनुरी-५५७, सेनगाव-११११ अशी रखडलेल्या कामांची तालुकानिहाय संख्या आहे. अनेक कामे दुसऱ्या वर्षी पुन्हा सुरू केली जात नाहीत. त्याचा ताळमेळही बहुतेक यंत्रणा ठेवत नाहीत. काही ठिकाणी ग्रामस्थांनी रेटा लावला म्हणूनच ही कामे पूर्ण करण्याची तसदी घेतली जाते. तर अर्धवट कामांवर शासनाने केलेला खर्च मात्र वाया जातो. निदान हे टाळण्यासाठी तरी ही बाब गांभिर्याने घेणे गरजेचे आहे. अनेक ठिकाणी नवे डीएसआर दर आल्याने अंदाजपत्रक सुधारित करावे लागते. मूळ कामासाठीच मोठे हेलपाटे खावे लागल्याने यंत्रणा रखडलेल्या कडे दुर्लक्ष करतात. त्याचाही परिणाम या कामांवर होतो. वैयक्तिक लाभाच्या योजनांत तेवढा लाभार्थीच पाठपुरावा करतो. त्यालाही कार्यारंभ आदेश देण्यापासून, वेळोवेळी मोजमाप, मस्टर, लाभाची रक्कम मिळण्यासाठी त्यात येणाऱ्या प्रत्येक घटकाला खुश करताना काळजावर दु:खाच्या डागण्या लावून घ्याव्या लागतात.