शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

वर्षाला साडेतीन लाखांचे उत्पन्न वाढणार

By admin | Updated: July 4, 2016 00:25 IST

लातूर : लातूर शहरातील मुख्य रस्त्यांवरील दुभाजकातील विद्युत खांबावर विविध पक्ष संघटना तसेच खाजगी कोचिंग क्लासेसमार्फत जाहिरात फलक लावण्यात येतात़

लातूर : लातूर शहरातील मुख्य रस्त्यांवरील दुभाजकातील विद्युत खांबावर विविध पक्ष संघटना तसेच खाजगी कोचिंग क्लासेसमार्फत जाहिरात फलक लावण्यात येतात़ आता मनपाने त्यासाठी दर आकारले असून, प्रति पोल हजार रूपये वार्षिक भाडे आकारले आहे़ या जाहिरातींच्या माध्यमातून वर्षाला ३ लाख ६१ हजार ५३६ रूपये उत्पन्न मिळविण्याचा मनपाचा मानस आहे़ त्यादृष्टीने स्थायी समितीच्या बैठकीत जाहिरातीचे दर निश्चित करण्यात आले आहेत़ यापुढे एकाही पोलवर विनाशुल्क जाहिरात लागणार नाही, याची खबरदारी घेण्याचे निर्देश स्थायी समितीचे सभापती विक्रांत गोजमगुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत़लातूर शहरातील गरूड चौक ते पाच नंबर चौक आणि राजीव गांधी चौक ते रेणापूर चौक तसेच राजीव गांधी चौक ते गरूड चौकापर्यंत मनपाचे २६९ पोल आहेत़ दुभाजकातील पोलवर जाहिरात करण्यासाठी मनपाने भाडे आकारण्याचा निर्णय घेतला आहे़ प्रति पोलि १ हजार रूपये वार्षिक भाडे आकारण्यात आले आहे़ मनपाकडे नोंदणी केल्यानंतरच या पोलवर फलक लावता येणार आहेत़ ३ बाय ४ चौरस फुटाचा बोर्ड या पोलवर लावता येईल़ न्यायाल्याने घालून दिलेल्या नियम व अटींना अधिन राहून मनपाच्या स्थायी समितीने उत्पन्नवाढीसाठी हा निर्णय घेतला आहे़कमीत कमी एक वर्ष आणि जास्तीत जास्त तीन वर्ष जाहिरात करण्यासाठी २६९ पोल दिले जातील़ एका पोलवर दोन्ही बाजुने जाहिरात करण्यासाठी प्रति महिना ६६२ रूपये व वार्षिक भाडे १३४४ रूपये होते़ तर वार्षिक भाडे ३ लाख ६१ हजार ५५६ रूपये होतात़ तीन वर्षासाठी दिले तर १० लाख ८४ हजार ६०८ रूपये होते़ या दरात आणखीन वाढ करण्याचे नियोजन आहे़ सद्य:स्थितीत प्रस्तुत दरानुसार मनपाला उत्पन्न अपेक्षित असून, यासंदर्भात जाहिरात निविदा मागविण्यात येत आहेत़ तसा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेतला असून यातून मनपाला चांगले उत्तन्न मिळेल, सभापती विक्रांत गोजमगुंडे यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)