शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आयकरची वेबसाइट हँग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:28 IST

: आयकर आॅडिट रिपोर्ट दाखल करणे व रिटर्न भरण्यासाठी मंगळवारी अखेरचा दिवस होता; पण आयकर विभागाची वेबसाइट दुपारनंतर हँग झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : आयकर आॅडिट रिपोर्ट दाखल करणे व रिटर्न भरण्यासाठी मंगळवारी अखेरचा दिवस होता; पण आयकर विभागाची वेबसाइट दुपारनंतर हँग झाली. यामुळे सीए, कर सल्लागारांचा ताण वाढला होता. रात्री उशिरापर्यंत कार्यालयात सीए व त्यांचे कर्मचारी बसून होते.सोमवारी ३० आॅक्टोबर रोजी जुलै २०१७ ची जीएसटीआर-२ आणि जीएसटीआर-३ ही विवरणपत्रे भरण्यास अनुक्रमे ३० नोव्हेंबर आणि ३१ डिसेंबर २०१७ पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली. यामुळे व्यापारी, उद्योजक, सीए, करसल्लागारांना थोडासा दिलासा मिळाला होता; पण तो फार वेळ टिकू शकला नाही. कारण, आर्थिक वर्ष २०१६-२०१७ चे आयकर आॅडिट रिपोट दाखल करणे व रिटर्न भरण्याची ३१ आॅक्टोबर शेवटची तारीख होती. यामुळे सीए, करसल्लागारांमध्ये लगीनघाई सुरूहोती. एक आॅडिट रिपोर्ट दाखल करणे व रिटर्न ‘इन्कम ट्रॅक्स ई-फायलिंग डॉट जीओव्ही डॉट इन’ या वेबसाइटवर आॅनलाइन भरण्यास कमीत कमी अर्धातास लागत होता. एवढ्या धीम्यागतीने नेटवर्क सुरूहोते. दुपारी २ वाजेपासून वेबसाइटवर करदात्यांचा ‘आरएसए’ टोकन नंबर विचारला जाऊ लागला. यामुळे माहिती भरण्यास आणखी उशीर होऊ लागला. यात कहर म्हणजे ४.३० वाजेपासून तर वेबसाइट हँग झाली. यामुळे सर्वत्र गोंधळ उडाला. तासन्तास बसूनही एकही आॅडिट रिपोर्ट, रिटर्न दाखल होत नसल्याने सीए, करसल्लागार, अकाऊंटंट यांच्यावर मोठा ताण वाढला होता. सीए आॅफिसमध्ये करदात्यांचे सतत फोन खणखणत होते. यासंदर्भात सीए उमेश शर्मा यांनी सांगितले की, ज्यांची वार्षिक उलाढाल २ कोटींपेक्षा अधिक आहे. त्यांचा टॅक्स आॅडिट रिपोर्ट व रिटर्न दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. सोमवारी आम्ही दिवसभरात २६ फाइल अपलोड केल्या होत्या. मात्र, आज ६ फाइलच अपलोड करू शकलो. फाइल अपलोड करण्याचे बटण दाबले की, आपण ‘डिजिटल क्यू’ मध्ये आहात. असा संदेश मिळत होता. कारण, देशभरात एकाच वेळी लाखो फाइल अपलोड करण्यात येत असल्याने वेबसाइटवरील ताण प्रचंड वाढला व अखेर ती हँग झाली. जीएसटीप्रमाणे आयकर विभागही आॅडिट रिपोर्ट व रिटर्न भरण्याची तारीख वाढवून देते का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.