औरंगाबाद : लिनन वस्त्र प्रावरणाच्या क्षेत्रातील नं. १ चा ब्रँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लाईमलाईट दालन शहरवासीयांच्या सेवेत सुरू झाले आहे. निरालाबाजार परिसरातील या दालनाचे उद्घाटन शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते झाले. उच्च अभिरुची जपणाऱ्या चोखंदळ ग्राहकांची पसंती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लिनन वस्त्र प्रकारातील हजारो व्हरायटीजचा खजिना लाईमलाईटच्या माध्यमातून औरंगाबादकर ग्राहकांसाठी आता खुला झाला आहे. याप्रसंगी आ. प्रदीप जयस्वाल, माजी आ. नामदेव पवार, किशनचंद तनवाणी, नगरसेवक समीर राजूरकर, फ्रँचायझी सचिन गोमे व गोविंद घाडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी सांगितले की, लिननमधील नं. १ चा ब्रँड अशी ओळख असलेल्या लाईमलाईट दालनामुळे शहराच्या लौकिकात भर पडली आहे. आजवर विशिष्ट ग्राहक वर्गापर्यंत मर्यादित असणारी लिननची वस्त्र प्रावरणे आता शहरातील सर्वसामान्यांसाठीही उपलब्ध झाली आहेत. लाईमलाईट म्हणजे मराठी उद्योजकांनी लिननच्या क्षेत्रात घेतलेली मोठी भरारी होय. संचालक सुमुख आगाशे म्हणाले की, लिनन वस्त्र प्रकाराला वाहिलेले लाईमलाईट हा एकमेव ब्रँड असून, अवघ्या दोन वर्षात या क्षेत्रात अव्वल बनला आहे. पुण्यात लक्ष्मी रस्त्यावर सुरू झालेला लाईमलाईट आता राज्यभर विस्तारणार आहे.
लिननमधील नंबर वन ब्रँड ‘लाईमलाईट’ दालनाचे उद्घाटन
By admin | Updated: August 11, 2014 01:56 IST