फोटो ओळ...
विमानतळावरील नव्या पार्किंग व्यवस्थेचे फित कापून उद्घाटन करताना विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे, ‘सीआयएसएफ’चे डेप्युटी कमाडंट ए. मन्ना.
‘सुपर स्पेशालिटी’त
बालकावर उपचार
औरंगाबाद : घाटीतील सुपर स्पेशालिटी ब्लॉकच्या इमारतीत पहिल्यांदा ९ वर्षाच्या कोरोनाबाधित बालकावर उपचार करण्यात आले. उपचार पूर्ण झाल्यानंतर मंगळवारी या बालकाला रुग्णालयातून सुटी देण्यात आली, अशी माहिती विशेष कार्यअधिकारी डॉ. सुधीर चौधरी यांनी दिली.
आरोग्यदायी जीवनशैलीवर
तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन
औरंगाबाद : ‘किशोरवयीन मुलांमध्ये व्यायामाचे महत्व आणि आरोग्यदायी जीवनशैली ’ याविषयी मिशन पिंक हेल्थ, इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) तर्फे रविवारी सेमिनार घेण्यात आले. याप्रसंगी डॉ.मल्हार गणला, डॉ. अर्चना सारडा यांनी मार्गदर्शन केले. डॉ. प्रफुल्ल जटाळे यांनी सूत्रसंचालन केले. आयएमए अध्यक्ष डॉ. संतोष रंजलकर, सचिव डॉ. यशवंत गाडे, मिशन पिंक हेल्थ समितीच्या राज्यप्रतिनिधी डॉ. अर्चना भांडेकर, समितीच्या औरंगाबाद शाखेच्या अध्यक्षा डॉ. उज्वला झंवर, सचिव डॉ. मयूरा काळे,डॉ. रश्मी बोरीकर, डॉ. अमोल देशमुख, डॉ. अमोल उबाळे यांचे सहकार्य लाभले.
आकाशवाणी चौकात
वाहनांना अडथळा
औरंगाबाद : आकाशवाणी चौकात रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून सिमेंटचे दुभाजक अस्ताव्यस्त पडलेले आहे. त्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना अडथळ्याला सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे मोंढ्याकडून त्रिमूती चौकाकडे जाणाऱ्या वाहनचालकांना यामुळे गैरसोयीला सामोरे जावे लागते.
रस्त्यावरील पार्किंगने
वाहतुकीला अडथळा
औरंगाबाद : सेव्हन हिल उड्डाणपूल ते आकाशवाणी चौक रस्त्यावर जागोजागी रस्त्यावरच वाहने उभी केली जात आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. याठिकाणी रस्त्याच्या कडेला सुरु असलेल्या कामाने भर रस्त्यावरच वाहने उभी करण्याचा प्रकार होत आहे.