शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘धूत ट्रान्समिशन’मध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद््घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 00:52 IST

औद्योगिक क्षेत्रात वायर आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात जगभरात अग्रगण्य असलेल्या धूत ट्रान्समिशन प्रा. लि. कंपनीत सोमवारी (दि.१८) मराठवाड्यातील सर्वात मोठ्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद््घाटन झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पर्यटनासोबत औद्योगिकनगरी म्हणून ओळख असलेल्या औरंगाबादेतील उद्योग क्षेत्रांत उत्पादनासाठी आता सौर ऊर्जेचा वापर करून विजेची बचत, पर्यावरणपूरक आणि हरित भविष्याकडे पाऊल पडले आहे. औद्योगिक क्षेत्रात वायर आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात जगभरात अग्रगण्य असलेल्या धूत ट्रान्समिशन प्रा. लि. कंपनीत सोमवारी (दि.१८) मराठवाड्यातील सर्वात मोठ्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद््घाटन झाले. प्रकल्पातील सुमारे ३ हजार सोलार पॅनलद्वारे दररोज ९९७ किलो व्हॅट विजेची निर्मिती होणार आहे.सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन बजाज आॅटो कंपनीच्या मटेरियल विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष डी.व्ही. रंगनाथ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरूडॉ. बी. ए. चोपडे, धूत कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राहुल धूत, अक्षिता असोसिएटचे संचालक एम. पी. शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. या कंपनीच्या छतावर सौर ऊर्जा निर्मितीसाठी जवळपास ३ हजार सोलार पॅनल लावण्यात आले. अक्षिता असोसिएटच्या माध्यमातून हा प्रकल्प पूर्णत्वास गेला आहे. यातून निर्माण होणाऱ्या सौर ऊर्जेपासून उत्पादन घेण्यात येणार आहे. त्यामुळे विजेची जवळपास २० ते २५ टक्के बचत होणार आहे. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमास उद्योजक प्रशांत देशपांडे,अक्षिता असोसिएटचे कैलास देशमुख, त्रिविक्रम कुलकर्णी, सुरेश क्षीरसागर, रवी चाबुकस्वार, मोहन रेघे, जी. जी. वेलापूरकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMIDCएमआयडीसी