शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

कारभार सुधारा अन्यथा ‘इंक्रीमेंट’ थांबवू

By admin | Updated: May 30, 2017 00:27 IST

उस्मानाबाद : जिल्हा रूग्णालयापासून प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्रीच्यावेळी येणाऱ्या रूग्णांसह नातेवाईकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कउस्मानाबाद : जिल्हा रूग्णालयापासून प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्रीच्यावेळी येणाऱ्या रूग्णांसह नातेवाईकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे़ हा प्रकार ‘लोकमत-नाईट वॉच’ मध्ये चव्हाट्यावर आणण्यात आला होता़ या वृत्तमालिकेची दखल घेऊन पालकमंत्र्यांनी कारभार सुधारण्याच्या सुचना आरोग्य विभागाला दिल्या होत्या़ आता जिल्हा शल्यचिकित्सकांनीही उपजिल्हा रूग्णालयापासून ग्रामीण रूग्णालयाच्या अधीक्षकांना पत्र दिले असून, कामकाजात सुधारणा न झाल्यास ‘इंक्रीमेेंट’ थांबविण्याचा इशारा दिला आहे़शहरातील जिल्हा रूग्णालयापासून ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत सर्वत्रच रात्रीच्यावेळी अपेक्षित रूग्णसेवा मिळत नसल्याचा प्रकार ‘लोकमत नाईट वॉच’मध्ये समोर आला होता़ बोटावर मोजण्याइतक्या रूग्णालयांचा अपवाद वगळता इतर सर्वत्र परिस्थिती बिकट होती़ कुठे डॉक्टर गायब, कुठे कर्मचाऱ्यांचा अपवाद तर कुठे रूग्णवाहिकेचा अभाव अशा एक ना अनेक समस्यांचा फटका रूग्णांसह नातेवाईकांना सहन करावा लागत असल्याचे दिसून आले़ ‘लोकमत’ने या सर्व रूग्णालयांची रात्रीच्यावेळी पाहणी करून वृत्त प्रसिध्द केले होते़ या वृत्त मालिकेची दखल घेऊन पालकमंत्री दिवाकर रावते यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना कारभार सुधारण्याच्या सूचना देत रूग्णांना चांगल्या सेवा देण्याच्या सूचना दिल्या होत्या़ त्यानंतर आता जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ एकनाथ माले यांनीही उपजिल्हा रूग्णालय ते ग्रामीण रूग्णालयाच्या अधीक्षकांना पत्र काढले आहे़ वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत़ खासगी प्रॅक्टीस करतात़ अनेक ठिकाणी विजेची सोय नसून, रूग्ण स्थलांतराचे प्रमाण वाढल्याचे नमूद करीत त्रुटींची पूर्तता करावी, चुका होऊ नयेत, खासगी प्रॅक्टीस करू नये अशा सक्त सूचना पत्रात देण्यात आल्या आहेत़ सूचनांची दखल घेऊन कारभार सुधारला नाही तर आपली एक इंक्रीमेंट थांबविण्यात येईल, असा इशाराही जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिला आहे़ जिल्हा शल्यचिकित्सकांनी पत्राद्वारे इशारा दिला असला तरी याची अंमलबजावणी कितपत होणार ? जिल्हा रूग्णालयाचा कारभार खरेच सुधारणार का ? हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे़