शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महत्त्वाचे प्रकल्प दिल्लीत रखडले!

By admin | Updated: June 19, 2017 00:39 IST

औरंगाबाद : नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या दिल्लीतील मुख्यालयात महाराष्ट्रातील बहुतांश प्रकल्पांना ब्रेक लागला आहे.

विकास राऊत । लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या दिल्लीतील मुख्यालयात महाराष्ट्रातील बहुतांश प्रकल्पांना ब्रेक लागला आहे. प्रस्तावित कामे बीओटीवर करायची की, ईपीसीवर याबाबतचा निर्णय होत नसल्यामुळे ती कामे सध्या कागदावरच अडकून पडल्याची माहिती विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.बीओटी (बांधा, वापरा, हस्तांतरित करा) आणि ईपीसी (इंजिनिअरिंग प्रॉक्युमेंट कन्स्ट्रक्शन्स) यापैकी कोणत्या पर्यायाने ती कामे करायची यासाठी एनएचएआयच्या नागपूर विभागीय कार्यालयात वारंवार बैठकीचे सत्र सुरू आहे. परंतु त्याबाबत अजून निर्णय झालेला नाही. ईपीसीमध्ये कंत्राटदार डिझाईनपासून बांधकामांपर्यंत सर्व कामे करतो. ती बीओटीमध्ये टोल वसुली करण्याचा प्रकार असतो. खाजगीकरणातून प्रकल्पनिर्मिती होते. राज्यातील अकोला, नागपूर, खामगाव, सोलापूर, औरंगाबादमधील काही महत्त्वाच्या प्रकल्पांवर निर्णय होत नसल्याने ती कामे रेंगाळली आहेत.औरंगाबादमधील जालना रोड आणि बीड बायपास रुंदीकरणाच्या सुमारे ८०० कोटी रुपयांच्या कामांचा डीपीआर देऊन वर्ष होत आले आहे. त्या कामाला मंजुरी देण्यात आली असली तरी निविदा प्रक्रियेकडे ती कामे सरकलेली नाहीत. मध्यंतरी एनएचएआयने काही कामांच्या बीओटीच्या निविदेला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे अ‍ॅन्युटीवर निविदा प्रसिद्धीस दिल्या. परंतु अ‍ॅन्युटीच्या निविदांनादेखील प्रतिसाद मिळाला नाही. एक निविदा आल्यामुळे पुन्हा निविदा मागविण्याची वेळ आली.