शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मनपा सर्वसाधारण सभेतील महत्त्वाचे निर्णय

By admin | Updated: August 11, 2016 01:26 IST

औरंगाबद : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बुधवारी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. काही विकासकामांवर तर काही धोरणात्मक विषयांवर निर्णय घेण्यात आले. त्यावर एक दृष्टिक्षेप.

औरंगाबद : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बुधवारी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. काही विकासकामांवर तर काही धोरणात्मक विषयांवर निर्णय घेण्यात आले. त्यावर एक दृष्टिक्षेप.महापालिकेच्या कर आकारणीच्या नियमावलीवरच नगरसेवकांनी बोट ठेवले. महापालिकेच्या स्थापनेपूर्वीपासून जी पद्धत आहे, त्या पद्धतीने कर आकारणी सुरू आहे. कर आकारणीसाठी उपनियम मनपाने तयार केलेले नाहीत. हे उपनियम तयार करून सर्वसाधारण सभेसमोर मंजुरीसाठी ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.४मागील पंधरा महिन्यांपासून ११५ वॉर्डांमध्ये विकासकामे ठप्प आहेत. प्रत्येक कामासाठी निधी नाही, अर्थसंकल्पात तरतूद आहे का? असे प्रश्न विचारण्यात येतात. दर महिन्याला अधिकाऱ्यांच्या पगारावर मनपा कोट्यवधी रुपये खर्च करते. शहराच्या विकासासाठी सर्व अधिकाऱ्यांनी एक महिन्याचा पगार द्यावा. सर्व नगरसेवकही एक महिन्याचे मानधन देतील, असा प्रस्ताव माधुरी अदवंत यांनी ठेवला. मात्र, यावर सखोल चर्चा झाली नाही.४शहरातील पथदिव्यांच्या मुद्यावर सर्वपक्षीय नगरसेवकांनी विद्युत विभागाचे उपअभियंता देशमुख यांना धारेवर धरले. देशमुख अजिबात कोणत्याच कामाचे नाहीत, त्यांना त्वरित घरी पाठवा, असा आक्रोश यावेळी करण्यात आला. आयुक्तांनी देशमुख यांच्या मदतीला धावून येत तुमचे प्रश्न मी दोन दिवसांत सोडवतो, असे नमूद केले. सर्व कामे आयुक्त करणार तर देशमुख काय करणार, असा टोलाही नगरसेवकांनी लावला.शहर विकास आराखडा खंडपीठात रद्द झाल्यानंतर बुधवारी मनपाच्या सर्वसाधारण सभेत सर्व नगरसेवकांच्या एका पत्रावर सह्या घेण्याची छुपी मोहीम सुरू होती. काही नगरसेवकांनी सह्या देण्यास नकार दिला. या पत्रावर विकास आराखड्याच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याचा मजकूर लिहिला होता. सायंकाळी सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याचा अशासकीय प्रस्ताव मंजूर करण्यात आला.४सिडको एन-६ येथील भगवान शिक्षण प्रसारक मंडळाने अनधिकृत बांधकाम केले आहे. भोगवटा प्रमाणपत्र न घेता इमारतीचा रुग्णालयासाठी वापर सुरू केल्याच्या मुद्यावरून काँग्रेसच्या नगरसेविका रेश्मा कुरैशी यांनी मनपासमोर उपोषण केले. नगरसेवक भाऊसाहेब जगताप यांनी सर्वसाधारण सभेत हा मुद्या उपस्थित केला. आयुक्त बकोरिया यांनी उद्याच भगवान शिक्षण संस्थेच्या अनधिकृत इमारत वापराच्या पाहणीसाठी मनपा अधिकाऱ्यांचे एक पथक पाठविण्याची घोषणा केली.