शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

‘नराधमाला तात्काळ अटक करा..!’

By admin | Updated: February 28, 2017 00:59 IST

अंबाजोगाई :गिरवली येथे बलात्कार करुन फरार झालेल्या नराधमाला तात्काळ अटक करा. या मागणीसाठी सोमवारी ग्रामस्थांचा मोर्चा अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

अंबाजोगाई : तालुक्यातील गिरवली येथे ७ फेब्रुवारी रोजी शेतमजुरी करणाऱ्या महिलेवर बलात्कार करुन फरार झालेल्या नराधमाला तात्काळ अटक करा. या मागणीसाठी सोमवारी ग्रामस्थांचा मोर्चा अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. तब्बल १२ किमीचे अंतर कापून मोर्चेकरी बैलगाड्यांसह शहरात दाखल झाले होते.गिरीवली येथे शेतकाम करणाऱ्या महिलेवर गावातीलच बाळू शामराव काळे याने अत्याचार केला होता. सुरुवातीला विनयभंग व नंतर बलात्काराची फिर्याद बर्दापूर ठाण्यामध्ये नोंद झाली होती. तीन आठवडयाचा कालावधी उलटूनही आरोपी सापडत नसल्याने ग्रामस्थांनी सोमवारी गिरवली ते अंबाजोगाई असा १२ कि.मी. अंतराचा ‘नराधम प्रतिबंधक मोर्चा’ काढला. हा मोर्चा गिरवली सबस्टेशन, पिंपळा, शेपवाडी, भगवानबाबा चौक, अण्णा भाऊ साठे चौक, आंबेडकर चौक, सावरकर चौक, शिवाजी चौकमार्गे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. आरोपीला अटक करा..., महिलांना संरक्षण द्या... अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली. त्यामुळे अपर जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला. गिरवली येथील ग्रामस्थ २५० बैलगाड्यांसह शहरात दाखल झाले. या मोर्चात कालिदास आपेट, प्रताप आपेट, विनोदकुमार बुरांडे, बळवंत बावणे, अ‍ॅड. माधव जाधव, गोविंद पोतंगले, दाजीसाहेब लोमटे, मनोज कदम, संजय आपेट, अ‍ॅड. अमित गिरवलकर, शैलेंद्र आपेट, यशवंत आपेट, केतन निसाले यांच्यासह ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांना निवेदन दिले. त्यांनी योग्य त्या कारवाईचे आश्वासन दिल्यानंतरच मोर्चेकरी शांत झाले. यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. (वार्ताहर)