शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

डॉक्टरांच्या वर्गणीतून साकारतोय ‘आयएमए’ हॉल

By admin | Updated: July 1, 2014 00:12 IST

हिंगोली : व्याख्यानमालेपासून ते लग्नसोहळ्यापर्यंतच्या कार्यक्रमांसाठी हिंगोलीत नेहमीच सभागृहाची उणीव भासते. कितीही पैसे देण्याची तयारी केली असली डॉक्टर्स असोसिएशनला देखील अनेकदा सभागृह मिळाले नाही.

हिंगोली : व्याख्यानमालेपासून ते लग्नसोहळ्यापर्यंतच्या कार्यक्रमांसाठी हिंगोलीत नेहमीच सभागृहाची उणीव भासते. कितीही पैसे देण्याची तयारी केली असली डॉक्टर्स असोसिएशनला देखील अनेकदा सभागृह मिळाले नाही. परिणामी हिंगोलीतील डॉक्टरांनी एकत्र येवून संघटनेच्या माध्यमातून एखादे सभागृह उभारण्याचा विडा उचलला. आजघडीला ८०० स्क्वेअर फुट जागेतील पहिला मजला साकारला गेला. आगामी काळात बांधकाम पूर्ण होतच गरजूंना सामाजिक उपक्रमांसाठी अत्यल्प दरात सभागृह देण्याचा मानस ‘डॉक्टर्स डे’च्या निमित्याने संघटनेने व्यक्त केला आहे. १९६२ वर्षी डॉ. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर्स असोसिएशनची स्थापना झाली. संघटनेतील डॉ. वसंत भाले, डॉ. अशिष पातूरकर आाणि डॉ. श्रीपाल दोडल हे विद्यार्थ्यांच्या तपासणीसाठी आदर्श महाविद्यालयात जात होते. तपासणीसाठी प्रत्येक विद्यार्थ्यांमागे डॉक्टरांना १ रूपया मिळत होता. सलग आठ वर्ष केलेल्या कामाची रक्कम खर्च न करता संघटनेच्या दृष्टीकोणातून प्लॉट विकत घेण्याचा विचार तिघांसमोर आला; परंतु पुरेशा पैशांअभावी आदर्श एज्युकेशन सोसायटीने १९६९ साली कमी दरात डॉक्टर्स असोसिएनसाठी प्लॉट दिला होता. दरम्यान १९७० पासून २००९ पर्यंत संघटनेकडून फारशे प्रयत्न झाले नाहीत. २००० वर्षानंतर कार्यक्रमांची रेलचेल वाढल्याने सभागृहाची उणीव भासत गेली. संघटनेला अनेकदा सभागृह मिळाले नाहीत. पुढील तीन वर्षांत संघटनेतील डॉ. सुर्यकांत घट्टे, डॉ. जयदीप देशमुख आणि डॉ. के. एच. गिरी यांनी सभागृह उभारण्याची संकल्पना मांडली. संघटनेच्या उपलब्ध जागेत सभागृह बांधता येत नव्हते. म्हणून जूना प्लॉट विकून बळसोंड भागात ८०० स्क्वेअर फुटाचा नवीन प्लॉट विकत घेतला; परंतु सभागृहाच्या बांधकामासाठी लागणारा भरमसाठ पैैसा संघटनेकडे नव्हता. बाहेरून मदत मिळण्याची आशा धूसर होती. आशात संघटनेची सूत्रे डॉ. किशन लखमावर आणि डॉ. गोपल कदम यांच्या हाती आली. सभागृहासाठी संघटनेतील डॉक्टरांकडून वर्गणी करण्याची योजना पुढे आली. मोठ्या प्रमाणात लागणारी रक्कम लोकवर्गणीतून जमा होणे शक्य नव्हते. संघटनेतील डॉक्टरांची संख्या पाहता क्लुप्ती लढविली. त्यात बांधकामासाठी घेतलेली रक्कम कालांतराने परत करण्याच्या करारावर वर्गणी जमा करण्याचे ठरविले. त्यातही किरायाच्या खोलीत दवाखाना चालविणाऱ्या डॉक्टरांना एकदाच लाखो रूपये देणेहे शक्य नव्हते. म्हणून एका लाखाच्या रक्कमेचे चार टप्पे करून निधी जमा करण्यास सुरूवात झाली. सुरूवातीला साडेतीन लाखांच्या रक्कमेतच भूमीपूजन करून पायाउभारणी करण्यात आली. दरम्यान सातत्याने लक्ष दिल्याने आजपर्यंत १८ लाख ५० हजारांचा निधी जमा झाला. त्या निधीतून आज पहिल्या मजल्यापर्यंत काम पूर्ण झाले आहे. ८०० स्क्वेअर फ्लॉटमध्ये प्रशस्त हॉल उभारण्यात येत आहे. सभागृहात लॉन टेनिसचा कोर्ट देखील उभारण्यात येत आहे. कार्यक्रमानिमित्य ऐणाऱ्या वाहनांसाठी वाहनतळाची व्यवस्था करण्यात येत आहे. बाहेरगावातून येणाऱ्यांना निवासाची व्यवस्था व्हावी, यासाठी १२ खोल्या बांधण्यात येत आहेत.सभागृहात जवळपास २०० लोक आरामाने बसू शकतील. लवकरच सभागृहाचे काम पूर्ण होणार आहे. संघटनेने उदात्त हेतू ठेवून सामाजिक उपक्रमासाठी गरजू लोकांना अत्यंत कमी दरात सभागृह देण्याचे सुतोवाच संघटनेचे अध्यक्ष डॉ. किशन लखमावार यांनी ‘डॉक्टर्स डे’च्या निमित्याने केले आहे. ...म्हणून डॉक्टर्स डेअमेरिकेत वैैद्यकीय शिक्षण घेतलेले बिदनचंद्र रॉय १४ वर्ष पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते. देशात मोफत शस्त्रक्रिया आणि औषधोपचाराची संकल्पना त्यांनीच राबविली. स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी प्रत्येकाने आरोग्याच्या दृष्टीने सुदृढ होण्याचा नारा त्यांनी दिला होता. दरम्यान एका आंदोलनात आजारी पडलेल्या महात्मा गांधी यांनी स्वदेशीचा नारा दिल्यामुळे विदेशी औषधी न घेण्याचा निर्धार त्यांनी केला. प्रकृती बिघडत गेल्याने बिदनचंद्र रॉय हे गांधीजीच्या उपचारासाठी दाखल झाले; मात्र गांधीजींनी स्वदेशीची आठवण करून देताच रॉय यांनी स्वातंत्र्यासाठी ४०० मिलीयन भारतीयांना हा विदेशी औषधोपचार आहे. हा खटाटोप भारतीयांसाठी म्हणून तुम्हाला असल्याचे सांगत गांधीजींचे वृत्त तोडीत त्यांना ठणठणीत केले. पुढे रॉय यांनी स्वत:चे घर देखील एका हॉस्पीटलला दान केले. १ जुलैै १८८२ साली जन्मलेले रॉय १ जुलैै १९६२ साली अनंतात विलीन झाले. त्यांच्या कार्याची आणि कृतज्ञतेसाठी आठवण म्हणून भारतात १ जुलै ‘डॉक्टर्स डे’ साजरा केला जात असल्याची माहिती डॉ. गोपाल कदम यांनी दिली.