शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये चालतोय गर्भपाताच्या गोळ्यांचा अवैध ‘उद्योग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 19:26 IST

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या घेतल्याने अतिरक्तस्राव आणि अर्धवट गर्भपात होण्याचे प्रकार होत आहेत.

ठळक मुद्देआरोग्य विभागाचा कानाडोळाअर्धवट गर्भपात झालेले घाटीत आठवड्याला दोन रुग्ण

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : जिल्ह्यात गर्भपाताच्या गोळ्यांचा अवैध विक्रीचा ‘उद्योग’ सुरू आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या घेतल्याने अतिरक्तस्राव आणि अर्धवट गर्भपात होण्याचे प्रकार होत आहेत. घाटीतील प्रसूतीशास्त्र विभागात आठवड्याला दोन रुग्ण दाखल होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

गर्भपाताच्या गोळ्या ठराविक आठवड्यापर्यंत घेण्याचा नियम असताना त्यानंतरही वापरण्याचा प्रकार होत आहे. शिवाय गर्भपाताच्या गोळ्या घेताना पहिली गोळी घेतल्यावर ठराविक तासांनी दुसरी गोळी घ्यायची असते; परंतु डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बेकायदेशीरपणे गोळ्या घेणाºयांना त्याविषयी गोळीबद्दल माहितीच दिली जात नाही. त्यामुळे या गोळ्या घेणाºया महिलांमध्ये अपूर्ण गर्भपात  होतो. त्यातून अधिक प्रमाणात रक्तस्राव आणि जंतुसंसर्ग होण्याचा प्रकार होतो. त्यामुळे महिलेला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येते. 

या प्रकारातून महिलांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. घाटी रुग्णालयात अधिक रक्तस्राव झाल्याने गंभीर अवस्थेत आठवड्याला दाखल होणाºया महिला आता नित्याची बाब झाली असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. ग्रामीण भागातील नागरिकांबरोबर शहरी सुशिक्षित लोकांकडूनही या गोळ्यांची खरेदी केली जात आहे.  आरोग्य विभागाचा या प्रकारांकडे कानाडोळा होत आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यात असा प्रकार नसल्याचा दावा आरोग्य विभागाने केला.

दीड ते दोन हजारांत विक्रीचारशे ते पाचशे रुपये किंमत असलेल्या गर्भपाताच्या गोळ्या अक्षरश: दीड ते दोन हजारांपर्यंत सर्रास होत असल्याचे समजते. ग्रामीण भागासह शहरी भागात डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या गोळ्या उपलब्ध करून देणारे सक्रिय आहेत. परंतु त्यांच्यापर्यंत आरोग्य विभाग पोहोचत नसल्याने हा ‘धंदा’ जोरात सुरू असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

पुढे गर्भधारणेची शक्यता कमी घाटीत आठवड्याला एक ते दोन रुग्ण येतात. ज्यांनी बाहेरून गर्भपाताच्या गोळ्या घेतलेल्या असतात. अनेक जण पात्रता नसलेल्या डॉक्टरांकडून गोळ्या घेतात. त्यातून रक्तस्राव, अर्धवट गर्भपाताचा प्रकार होतो. नेमक्याकोणाकडून गोळ्या घेतल्या हे रुग्ण सांगत नाहीत. हा प्रकार रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकतो. जंतुसंसर्ग होऊ शकतो. शिवाय पुढे गर्भधारणेची शक्यता कमी होते. कायदेशीररीत्या गर्भपात होतो, याविषयी जनजागृती होणे गरजेचे आहे.-डॉ. श्रीनिवास गडप्पा, विभागप्रमुख, प्रसूतीशास्त्र विभाग, घाटी

४० टक्के महिलांत गुंतागुंत डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गर्भपाताच्या गोळ्या घेतल्याने ४० टक्के महिलांत गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण होते. प्रामुख्याने ग्रामीण भागांत गर्भपातासाठी सर्रास गोळ्या लिहून देण्याचा प्रकार होत आहे. यासंदर्भात मी अमेरिकेतील परिषदेत केस स्टडी सादर केली आहे. सॅम्पल म्हणून दिलेल्या गोळ्यांचीही विक्री केली जाते.- डॉ. अनिरुद्ध कुलकर्णी, सचिव, महाराष्ट्र रेडिओलॉजी असोसिएशन

जिवावर बेतू शकतेडॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गर्भपाताच्या गोळ्या घेणे जिवावर बेतू शकते. गोळ्या घेतल्यानंतर अधिक रक्तस्राव झाल्याने महिला रुग्णालयात येतात. अर्धवट गर्भपात झालेल्या महिला रुग्णालयात येतात. त्यांना काळजीपूर्वक विचारणा केल्यानंतर गर्भपाताच्या गोळ्या घेतल्याचे सांगतात. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध विक्रेत्यांनी गर्भपाताच्या गोळ्या देता कामा नये.- डॉ. वर्षा देशमुख, अध्यक्षा, स्त्रीरोग संघटना

टॅग्स :pregnant womanगर्भवती महिलाmedicineऔषधंdoctorडॉक्टर