शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

‘एम.फार्मसी’ प्रवेशात दिव्यांग उपेक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 00:56 IST

औषधनिर्माणशास्त्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेशाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेत सुरुवातीला दिव्यांगांची स्वतंत्र गुणवत्ता यादी लावण्यात आली. मात्र प्रत्यक्षात तीन फेºयांमध्ये एकाही दिव्यांगाला आरक्षणानुसार प्रवेश मिळाला नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : राज्य सरकारच्या सीईटी सेलमार्फत औषधनिर्माणशास्त्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेशाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेत सुरुवातीला दिव्यांगांची स्वतंत्र गुणवत्ता यादी लावण्यात आली. मात्र प्रत्यक्षात तीन फेºयांमध्ये एकाही दिव्यांगाला आरक्षणानुसार प्रवेश मिळाला नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. याविषयी एका विद्यार्थ्याने तंत्रशिक्षण सहसंचालक कार्यालयात तक्रार नोंदविली आहे.औषधनिर्माणशास्त्राच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची नुकतीच तिसरी प्रवेश फेरी जाहीर करण्यात आली आहे. या फेरीत अभिजित भीमराव गायकवाड या दिव्यांग विद्यार्थ्याचा खुल्या प्रवेश गटातून खाजगी महाविद्यालयात नंबर लागला आहे. त्याचा खुल्या गुणवत्ता यादी २४३५ क्रमांक होता. मात्र दिव्यांगांच्या गुणवत्ता यादीत ९ वा क्रमांक होता. दिव्यांगांना असलेल्या आरक्षणानुसार त्याला शासकीय महाविद्यालयात प्रवेश मिळणे अपेक्षित होते. मात्र दिव्यांगाचे आरक्षण उपलब्ध जागेमध्ये बसत नाही. यामुळे दिव्यांगांनाही खुल्या गटातून प्रवेश देण्यात येत आहेत. तक्रारदार अभिजित गायकवाड म्हणाला, तिसºया फेरीत खाजगी महाविद्यालयात प्रवेश मिळाला. या महाविद्यालयाचे शुल्क भरू शकत नाही. दिव्यांगांना आरक्षण दिले तर शासकीय नंबर लागला आहे. आता शुल्काअभावी प्रवेश घेऊ शकत नाही. हा अन्यायच असल्याचे त्याने सांगितले. आतापर्यंत जाहीर झालेल्या तिन्ही फेºयांमध्ये एकाही गटातून दिव्यांगांना संधी देण्यात आलेली नाही. दिव्यांगांना एकूण जागेच्या ३ टक्के जागा राखीव ठेवण्याची तरतूद आहे. मात्र या तरतुदीची औषधनिर्माणच्या पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेत अंमलबजावणी करण्यात आलेली नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. याविषयी सीईटी सेलचे सहसंचालक दयानंद मेश्राम यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांना प्रतिसाद मिळाला नाही.