शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
3
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
4
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
5
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
6
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
7
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
8
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
9
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
10
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
11
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
12
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
13
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
14
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
15
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
16
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
17
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
18
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
19
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
20
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल

ऐतिहासिक वास्तू जतनाकडे दुर्लक्ष

By admin | Updated: October 12, 2016 01:11 IST

औरंगाबाद : तब्बल १०५ उद्याने व ५२ दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जात असलेल्या औरंगाबादची आजची अवस्था अत्यंत दयनीय आहे.

औरंगाबाद : तब्बल १०५ उद्याने व ५२ दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जात असलेल्या औरंगाबादची आजची अवस्था अत्यंत दयनीय आहे. विशेषत: ऐतिहासिक दरवाजे, उद्याने, पूल व वास्तूंच्या जतनाकडे होत असलेले दुर्लक्ष चिंताजनक आहे, असा सूर सोमवारी ‘लिबरल आर्टस्’च्या परिषदेत निघाला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील स्कूल आॅफ लिबरल आॅर्टस् आणि प्राचीन भारतीय संस्कृती विभाग तसेच औरंगाबाद हिस्ट्री सोसायटी यांच्या वतीने सोमवारी ही परिषद झाली. शहराचे भूषण असलेले ऐतिहासिक दरवाजे, बगीचे आणि पुलाचा वारसा आणि त्यांचे संवर्धन या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी डॉ. वि. ल. धारुरकर होते. यावेळी माजी राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. मोहंमद ओमर, डॉ. पुष्पा गायकवाड, प्रसिद्ध इतिहास संशोधक अब्दुल हाई, डॉ. राजेश रगडे उपस्थित होते. दिवसभराच्या या परिषदेत पहिल्या सत्रात ‘दरवाजे, पूल व उद्यानांचा वारसा’ या विषयावर चर्चा झाली. डॉ. रगडे यांच्या अध्यक्षतेखाली हा परिसंवाद झाला. यावेळी अब्दुल हाई म्हणाले, शहरात १०५ उद्याने व ५२ दरवाजे होते. तथापि यातील अनेक उद्याने आज नष्ट झाले आहेत. आपल्याकडे सुमारे तीन हजार दुर्मिळ ग्रंथ असून याचा अनुवाद व वापर होणे गरजेचे आहे. डॉ. उमर म्हणाले, औरंगाबाद शहराचा इतिहास सन १६१० ते २०१६ असा चारशे वर्षांचा आहे.शहराचे आजचे बकाल रूप पाहता आपण वारसा जतन करण्यात कमी पडत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. शहरातील दरवाजांची डागडुजी करून जतन व्हावे, असे डॉ. गायकवाड म्हणाल्या. लिबरल आर्टस् व औरंगाबाद हिस्ट्री सोसायटी यांच्यातर्फे शहराचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती डॉ. धारुरकर यांनी दिली. डॉ. बीना सेंगर यांनी सूत्रसंचालन तर संजय पाईकराव यांनी आभार आले. दुसऱ्या व तिसऱ्या सत्रात रफत कुरेशी, स्वप्नील जोशी, आदित्य वाघमारे, डॉ. दुलारी कुरेशी, डॉ. गोपाळ बछिरे आदींनी मार्गदर्शन केले. परिषदेत ११० इतिहास संशोधक सहभागी झाले.