शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘पासिंग’साठी अतिरिक्त रक्कम घेतल्यास फौजदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:39 IST

औरंगाबाद : नवीन वाहन घेणाऱ्या ग्राहकांची ‘हँडलिंग चार्जेस’च्या नावाखाली होणारी लूट थांबविण्यासाठी गृह विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आरटीओ ...

ठळक मुद्देलोकमत इम्पॅक्ट : वाहन नोंदणी शुल्क आणि करव्यतिरिक्त कोणतेही शुल्क आकारू नये

औरंगाबाद : नवीन वाहन घेणाऱ्या ग्राहकांची ‘हँडलिंग चार्जेस’च्या नावाखाली होणारी लूट थांबविण्यासाठी गृह विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आरटीओ कार्यालयात नव्या वाहनाच्या पासिंगसाठी नोंदणी शुल्क आणि कर याव्यरिक्त कोणत्याही प्रकाराचे अतिरिक्त शुल्क ग्राहकांकडून आकारण्यात येऊ नये. अतिरिक्त शुल्क आकारल्यास वाहन वितरक ांविरुद्ध फौजदारी कारवाई केली जाणार आहे.‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ म्हणणाºया सरकारच्या राज्यात आरटीओ कार्यालयात मात्र ‘बहोत खाऊंगा, खाने दूंगा’चा कारभार सुरू आहे. शहरात नव्याने नोंदणी होणाºया प्रत्येक दुचाकी, चारचाकी वाहनाच्या फाईलसाठी शोरूमचालकांना अतिरिक्त रक्कम द्यावी लागते. हा सर्व प्रकार ‘लोकमत’ने १८ ते २१ सप्टेंबरदरम्यान वृत्तमालिकेतून उघडकीस आणला. आरटीओ कार्यालयात नव्याने नोंदणी (पासिंग) होणाºया प्रत्येक दुचाकी, चारचाकी वाहनाच्या फाईलसाठी ग्राहकांना शोरूमचालकास अतिरिक्त रक्कम द्यावी लागते. काही शोरूमचालक झळ सोसून ही रक्कम स्वत:च भरतात, तर अनेक जण ‘लक्ष्मी दर्शन’ची ही रक्कम थेट ग्राहकांच्या खिशातूनच काढत आहेत. या रकमेची पावतीही ग्राहकांना दिली जात नाही. ‘हँडलिंग चार्जेस’च्या नावाखाली ग्राहकांकडून अतिरिक्त रक्कम वसूल केली जात होती.आरटीओ कार्यालयातील ‘लक्ष्मी दर्शन’च्या प्रकारावर चाप लावण्यासाठी १४ नोव्हेंबर रोजी गृह विभागाने एक शासन निर्णय जाहीर केला आहे. यामध्ये वितरकांनी वाहन विक्री करताना ग्राहकांकडून शासनाने विहित केलेल्या नोंदणी शुल्क आणि कर याशिवाय कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारण्यात येऊ नये, असे आदेश देण्यात आले आहेत. मोटार वाहन नोंदणी शुल्क व कराव्यतिरिक्त कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारल्यास संबंधित वाहन वितरकांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे या निर्णयाने ग्राहकांची अतिरिक्त शुल्काच्या भुर्दंडातून मुक्तता होण्यास मदत होणार आहे. शिवाय ‘आरटीओ’ कार्यालयातील ‘लक्ष्मी दर्शन’च्या प्रकारावर जरब बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.वितरकांनी दर्शनी भागात ‘कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही, काही तक्रार असल्यास विक्री व्यवस्थापकांनी संपर्क साधावा, समाधान न झाल्यास प्रादेशिक, उपप्रादेशिक परिवहन यांच्याकडे तक्रार करावी,’ आदी माहिती देणारा फलक लावण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.संगणक प्रणालीवर नोंद घ्यावीआरटीओ कार्यालयात वाहन नोंदणीची आॅनलाईन प्रक्रिया केली आहे. त्यामुळे मंजुरी, क्रमांक ही सर्व प्रक्रिया आॅनलाईन होणे अपेक्षित आहे; परंतु फाईल आरटीओ कार्यालयात नेणे, शोरूममध्ये येऊन तपासणीची प्रक्रिया होत आहे. त्यामुळे आॅनलाईन प्रक्रियेच्या नावाखाली टेबलाखालून व्यवहार होत असल्याचे दिसते; परंतु नव्याने नोंदणी होणाºया वाहनांसाठी शासनाने विहित केलेले शुल्क आकारूनच त्याची वाहन ४.० या संगणक प्रणालीवर नोंद घेण्याचीही सूचना करण्यात आली आहे.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसGovernmentसरकार