शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

‘आवाज’ कराल तर जेलची हवा !

By admin | Updated: December 20, 2014 23:37 IST

शिरीष शिंदे, बीड लग्न सराईस सुरुवात झाल्याने मुहूर्त असणाऱ्या दिवशी ठिकठिकाणी रस्त्यावरच डिजेवर ठेका धरणारी वऱ्हाडी मंडळी पहावयास मिळत आहे.

शिरीष शिंदे, बीडलग्न सराईस सुरुवात झाल्याने मुहूर्त असणाऱ्या दिवशी ठिकठिकाणी रस्त्यावरच डिजेवर ठेका धरणारी वऱ्हाडी मंडळी पहावयास मिळत आहे. डीजेचा आवाज ऐवढा मोठा असतो की, समोर उभ्या असणाऱ्या व्यक्तीला याच आवाजाने हार्ट अ‍ॅटक येतो की काय असा प्रश्न निर्माण होते. आवाजाची लिमिट क्रॉस करुन डीजे वाजविले जात असल्याच्या तक्रारी शिवाजी नगर पोलिसांकडे प्राप्त झाल्या असल्याने लग्नात डीजे वाजवु नका, या आशयाच्या नोटीसा डीजे चालकांना नोटीसीद्वारे दिल्या आहेत. लग्न समारंभागत डिजे लावणे जणु फॅशनच झाली आहे. डिजे लावून परण्या काढलेले चित्र क्वचित पहावयास मिळते. लग्नापुर्वी काढण्यात येणाऱ्या परण्यात डीजेची मागणी वाढली आहे. तसेच गणपती महोत्सवा दरम्यानही डीजेची डिमांड अधिक असते. त्यामुळे डीजे लावण्याची पद्धत हळुहळू रुढ होत गेली, आता पुर्वी पेक्षा अधिक मागणी वाढली आहे.विशेष म्हणजे केवळ बीड शहरातूच नव्हे तर सातारा, सांगली, पुणे, मुंंबई येथून लग्नामध्ये डीजे मागविण्यात येतात. आजवात सुस्पष्टता व मोठा आवाज यामुळे अनेकजण लग्नात डीजे लावण्यास प्राधान्य देतात. दरम्यान, त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून कानाचे पडदे फाटणाऱ्या डिजेच्या आवाजवर युवक चौका-चौकात नाचताना दिसून येत आहेत. डीजे..डीजे.. अशा करड्या आवाज मोठमोठ्या उच्च दर्जाच्या साऊंडवर वेगवेगळ्या प्रकारची गाणी लावली जातात. इतरांचा होत नाही विचार लग्न हा प्रत्येक कुटूंबियातील सर्वात आनंदाचा प्रसंग असतो. त्यामुळे अनेकजण वेगवेगळ्या प्रकारच्या आधुनिक सुवेधेवर खर्च करतात. त्यातील एक प्रकार डीचेचाही असतो. परण्या निघताना किंवा लग्न समारंभापुर्वी नवरदेव घोड्यावर बसलेला असतो त्याच्या समोर असतो डीजे व वऱ्हाडी मंडळी. लग्नात मोठ्या उत्सहाताने १२५ डेसिबलच्या आवाजात डीजे वाजविला जातो मात्र त्याचा इतरांना काय त्रास होता याचा विचार केला जात नाही. डीजे लाऊन युवक तल्लीनडीजे लाऊन नाचणारी युवका बहतांश वेळा मद्यधुंद अवस्थेत असतात. त्यावेळी आकाशाला भिडणारा आवाज कानावर पडला तर त्यांच्या उत्साहाला अधिक उधान येते. राष्ट्रीय महामार्गावरील जालना रोड व नगर रोड परिसरातील डीजे लाऊन वाजविला जातो. डीजेमुळे वाहन कोंडी झाली काय ?, इतरांना त्रास होतो काय? याचा कोणाताही विचार न करता मुले बेधुंद होऊन नाचतात. याचा त्रास नागरिकांना होत असल्याने त्यांनी आता थेट पोलिसांना तक्रार करण्यास सुरुवात केली आहे. चार मंगल कार्यालयांनाही नोटीसालग्न कार्यालयासाठी मंगल कार्यालय चालक मोठी रक्कम घेतात मात्र लग्नासाठी येणाऱ्या लोकांच्या वाहनासाठी पार्कींग व्यवस्था नसते. परिणामी वाहन कोंडी होते. लग्नासाठी येणाऱ्या लोकांच्या वाहनांची सोय करावी या आशयाची नोटीसही चार मंगल कार्यालयांना बजावण्यात आली आहे़४लहान मुले, वयो वद्ध व रुग्णांनासाठी डीजे घातक आहे. ४सर्व साधारणपणे डीजे हा ५५ ते ६० डेसिलबच्या दरम्यान वाजवायला हवा मात्र दिलेल्या लिमिटपेक्षा दुप्पट म्हणजे १२५ डेसिबलवर नेऊन डीजे वाजविला जातो.४वयोवृद्धांना ह्रदय विकाराचा धक्का येण्याची शक्यता नाकारता येत नाही.४त्यामुळे आता प्रशासन सतर्क झाले आहे़४लग्न समारंभात डीजे लावला जात असून त्याच्या अतिउच्च आवाजामुळे त्रास होत असल्याच्या तक्रार प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे लग्न समारंभात डीजे वाचवू नये या आशयाच्या नोटिसा पाठविण्याचे काम सुरु असल्याचे शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक उमेश कस्तुरे यांनी सांगितले.