शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

तूर डाळ न उचलल्यास साखर मिळणार नाही

By admin | Updated: September 12, 2016 23:22 IST

औरंगाबाद : तूर डाळ न उचलल्यास साखर देणार नाही, या तहसीलदारांच्या भूमिकेविरुद्ध स्वस्त धान्य दुकानदारांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.

औरंगाबाद : तूर डाळ न उचलल्यास साखर देणार नाही, या तहसीलदारांच्या भूमिकेविरुद्ध स्वस्त धान्य दुकानदारांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. स्वस्तात देण्यात येणारी तूर डाळ प्रत्यक्षात महागात पडत असल्याने स्वस्त धान्य दुकानदारांकडून ती उचलली जात नाही. तूर डाळीची उचल करावी अशी सक्ती तहसीलदार करीत आहेत. हे होत नाही, तोपर्यंत साखरेचे परमिट देण्यात येणार नाही, असा निर्णयही तहसीलदारांनी घेतला आहे.हा प्रकार योग्य नसल्याचे सांगण्यासाठी आज राज्य स्वस्त धान्य दुकानदार, केरोसिन परवानाधारक महासंघाचे अध्यक्ष डी.एन. पाटील यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी संजीव जाधवर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. रेशन दुकानांमध्ये उपलब्ध असलेल्या तूर डाळीत १५ टक्के डाळ ही सोयाबीन व हिरव्या वाटाण्याची आहे. तूर डाळ शिजण्यासाठी जितका वेळ लागतो, त्यापेक्षा अधिक वेळ रेशनमधून उपलब्ध तूर डाळ शिजण्यासाठी लागत आहे. त्यामध्ये रेशनची डाळ घेण्यास टाळाटाळ होत आहे. परिणामी ही डाळ दुकानांमध्ये तशीच पडून आहे. याचा भुर्दंड दुकानदारांना सहन करावा लागत असल्याचे पाटील यांचे म्हणणे आहे. शासनाने औरंगाबाद शहरातील सहा मॉलमध्ये ९४ रु. किलोप्रमाणे तूर डाळ उपलब्ध करून दिली. दुसरीकडे रेशनची तूर डाळ १०३ रु. प्रतिकिलो आहे, तर खुल्या बाजारातील तूर डाळ ८० ते ९० रु. किलोने उपलब्ध होऊ लागली आहे. त्यामुळे नागरिक स्वस्त म्हणून खुल्या बाजारातीलच तूर डाळ खरेदी करीत आहेत.