शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षेत नेटवर्कचा अडथळा आला, तर समन्वयकाला कळवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:04 IST

औरंगाबाद : पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमाची ऑनलाइन परीक्षा देताना विद्यार्थ्याला नेटवर्कची समस्या उद्‌भवली, तर त्याने तात्काळ आपल्या महाविद्यालयातील आयटी ...

औरंगाबाद : पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमाची ऑनलाइन परीक्षा देताना विद्यार्थ्याला नेटवर्कची समस्या उद्‌भवली, तर त्याने तात्काळ आपल्या महाविद्यालयातील आयटी कोऑर्डिनेटरकडे संपर्क करून ही बाब कळविल्यास त्याला पुन्हा पेपरची लिंक उपलब्ध करून दिली जाईल, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी सांगितले.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे स्थगित करण्यात आलेले पदवी अभ्यासक्रमाचे पेपर ३ मेपासून, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाची परीक्षा ५ मेपासून घेण्यात येणार आहे. आता उर्वरित पेपर व परीक्षा फक्त ऑनलाइन घेतल्या जाणार असून, ग्रामीण भागात विद्यार्थ्याला नेटवर्कची समस्या जाणवल्यास त्याने घाबरून न जाता तात्काळ ही घटना आपल्या संबंधित महाविद्यालयातील आयटी कोऑर्डिनेटरला कळवावी. त्या कोऑर्डिनेटरने विद्यापीठातील परीक्षा विभागाला त्यासंबंधी माहिती द्यावी. त्यानंतर लगेच संबंधित विद्यार्थ्याला आलेल्या समस्येविषयी खातरजमा केली जाईल. ऑनलाइन परीक्षेसंबंधीच्या पोर्टलवर कोणत्या विद्यार्थ्याला काय समस्या आली, हे ताबडतोब समजते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता त्यांना परीक्षा कालावधीत लगेचच लिंक उपलब्ध करून देण्याचे नियोजन विद्यापीठाने केले आहे. विद्यार्थ्यांनी थेट विद्यापीठाकडे तक्रार करण्याची आवश्यकता नाही, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.

चौकट......

मेअखेरपर्यंत निकालाचे नियोजन

कला व वाणिज्य शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाचे द्वितीय, तृतीय वर्षाचे बहुतांशी पेपर संपले आहेत. विज्ञान शाखेचे ३० टक्के पेपर बाकी आहेत. याशिवाय या तीनही शाखांच्या प्रथम वर्षाचे पेपर १५- १६ मेपर्यंत चालणार आहेत. प्रथम वर्षाची परीक्षा संपल्याशिवाय उर्वरित द्वितीय व तृतीय वर्षाचे निकाल तांत्रिकदृष्ट्या जाहीर करता येत नाहीत. दुसरीकडे, यापूर्वी ऑफलाइन झालेल्या परीक्षेतील पेपर तपासणीचा संपूर्ण अहवाल महाविद्यालयांकडून परीक्षा विभागाला प्राप्त झालेला नाही. कोरोना संसर्गामुळे महाविद्यालयांना तो अहवाल २ मेपर्यंत विद्यापीठाच्या पोर्टलवर अपलोड करण्याचा अवधी देण्यात आला आहे. त्यामुळे मेअखेरपर्यंत पदवी परीक्षेचे निकाल जाहीर होतील, अशी शक्यता परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी वर्तविली आहे.