औरंगाबाद : विरोधकांचा पोटशूळ उठला आहे. ते माझ्या विरोधात सतत काड्या करीत असतात. त्यांना समांतरचा करार रद्द व्हावा असे वाटत असते. परंतु लक्षात ठेवा समांतरची योजना आपण आणली आहे, शिवसेनेने आणली आहे. उद्धव ठाकरे यांनी या योजनेचे भूमिपूजन केले आहे. ही योजना टिकली पाहिजे, यासाठी शिवसेना नगरसेवकांनी व शिवसैनिकांनीच प्रयत्न केले पाहिजेत. हा करार रद्द झाल्यास लोक आपल्याला, नगरसेवकांना दगडं मारतील, असा स्पष्ट इशारा आज येथे खा. चंद्रकांत खैरे यांनी दिला. ते समर्थनगरातील शिवसेना संपर्क कार्यालयात शिवसैनिकांच्या मेळाव्यात बोलत होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त घ्यावयाच्या कार्यक्रमांची चर्चा करण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचा समारोप करताना खा. खैरे यांनी घणाघाती भाषण केले.
समांतरचा करार रद्द झाल्यास लोक दगडं मारतील
By admin | Updated: December 29, 2014 01:08 IST