शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
2
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
3
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
4
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
5
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
6
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
7
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
8
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
9
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
10
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
11
पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
12
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं आधीच दिलाय मोठा इशारा
13
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
14
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
15
"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल
16
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
17
समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
18
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
19
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!

नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आले, तर देशाचे ऐक्य धोक्यात येईल : भालचंद्र मुणगेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 14:14 IST

या देशातल्या गरिबांचाही न्यायालयावर विश्वास आहे. तो ज्या दिवशी उडेल, तेव्हा अराजकता माजेल,

ठळक मुद्देअकराव्या पंचवार्षिक योजनेत काँग्रेसने माहितीचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार आणि अन्नसुरक्षेचा अधिकार दिला.लोकांपर्यंत घेऊन जाण्यात काँग्रेस अपयशी ठरली. ही पोकळी मोदींनी भरून काढली आणि फायदा करून घेत सत्ता मिळवली.

औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आले, तर देशाचे ऐक्य, प्रगती, सलोखा आणि स्वातंत्र्य धोक्यात येईल, अशी भीती अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केली. तसेच कम्युनिस्टांना मोडीत काढायचे या एकाच हेतूने त्यांनी बंगालमध्ये ठाण मांडले. कोरोना संसर्गाच्या काळातही जाहीर सभा घेणे आणि कुंभमेळा भरवण्यास परवानगी देणे, ही घोडचूक असल्याचे ते म्हणाले.

लोकसंवाद प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी डॉ. मुणगेकर यांचे ‘वर्तमानातील राजकारण’ या विषयावर व्याख्यानाचे ऑनलाइन आयोजन करण्यात आले होते. या संवादमालेच्या सुरुवातीला काँग्रेसचे दिवंगत खासदार राजीव सातव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. व्याख्यानाची सुरुवात करताना डॉ. मुणगेकर म्हणाले, अकराव्या पंचवार्षिक योजनेत काँग्रेसने माहितीचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार आणि अन्नसुरक्षेचा अधिकार दिला. मात्र, हे लोकांपर्यंत घेऊन जाण्यात काँग्रेस अपयशी ठरली. ही पोकळी मोदींनी भरून काढली आणि फायदा करून घेत सत्ता मिळवली. कोरोनाबाबत राहुल गांधींनी फेब्रुवारीमध्येच इशारा दिला होता; पण मोदींनी तेव्हा हा सल्ला ऐकला नाही. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून सूचना केल्या. त्या पत्राला उत्तर देण्याचं सौजन्यही मोदींनी दाखवलं नाही. उलट केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी त्यांची खिल्ली उडवली. कोरोनाची साथ ज्या पद्धतीने हाताळली जात आहे, ती पद्धत अतिशय भयंकर आहे, अशी टीकाही डॉ. मुणगेकर यांनी केली. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनीही सरकारवर हलगर्जीपणाचा आरोप केल्याचा हवालाही त्यांनी दिला. 

तेव्हा अराजकता माजेलतर न्यायव्यवस्था कोसळली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पत्रकार परिषद घेऊन न्यायव्यवस्था धोक्यात असल्याचे सांगतात. या देशातल्या गरिबांचाही न्यायालयावर विश्वास आहे. तो ज्या दिवशी उडेल, तेव्हा अराजकता माजेल, अशी भीती डॉ. मुणगेकर यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकसंवादचे अध्यक्ष डाॅ. राजेश करपे यांनी केले. डॉ. कैलास अंभुरे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन संकेत कुलकर्णी यांनी केले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBhalchandra Mungekarभालचंद्र मुणगेकरcorona virusकोरोना वायरस बातम्या