शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

रक्त हवे, तर आधी रक्तदान करा; रक्ताच्या तुटवड्याने घाटी रक्तपेढीवर नामुष्कीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 16:32 IST

वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) विभागीय रक्तपेढीत रक्त व रक्तघटकांचा तुटवडा अधिक तीव्र झाला आहे. तुटवड्याने रक्ताची मागणी घेऊन येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांनाच रक्तदान करा आणि हवे असलेले रक्त घेऊन जा, असा सल्ला देण्याची नामुष्की रक्तपेढीच्या कर्मचाऱ्यांवर ओढावली आहे.

ठळक मुद्देघाटीतील विभागीय रक्तपेढीमध्ये दररोज जवळपास सुमारे ६० ते ७० बॅग रक्त आणि रक्तघटकांची मागणी उन्हाळ्याच्या सुट्यांमुळे रक्तदानात घट

औरंगाबाद : वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) विभागीय रक्तपेढीत रक्त व रक्तघटकांचा तुटवडा अधिक तीव्र झाला आहे. तुटवड्याने रक्ताची मागणी घेऊन येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांनाच रक्तदान करा आणि हवे असलेले रक्त घेऊन जा, असा सल्ला देण्याची नामुष्की रक्तपेढीच्या कर्मचाऱ्यांवर ओढावली आहे.

शासकीय कर्करोग रुग्णालयात दाखल एका रुग्णाचे नातेवाईक गुरुवारी (दि. १७) रक्तासाठी दुपारी ४ वाजेच्या सुमारास रक्तपेढीत दाखल झाले होते. यावेळी रक्तपेढीतील तज्ज्ञांनी रक्त घेण्यासाठी रक्तदान करावे लागेल, असे सांगितले. काही दिवसांपूर्वीच रक्तदान केलेले असल्याने आता रक्तदान करता येणार नाही. सोबत असलेल्या ज्येष्ठ नातेवाईकासही वयामुळे रक्तदान करणे अशक्य आहे. त्यामुळे रक्त कसे मिळवायचे,या विचाराने सदर नातेवाईक रक्तपेढीबाहेर हताशपणे बसून होता. रक्तासाठी दुपारी १२ वाजताही येऊन गेलो होतो, असे या नातेवाईकाने ‘लोकमत’च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

रक्ताच्या टंचाईने असाच अनुभव इतर अनेक रुग्णांच्या नातेवाईकांना येत आहे.  घाटी रुग्णालयासह कर्करोग रुग्णालयात रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण अधिक आहे. अनेकांना रक्त, रक्तघटकांची आवश्यकता असते. घाटीतील विभागीय रक्तपेढीमध्ये दररोज जवळपास सुमारे ६० ते ७० बॅग रक्त आणि रक्तघटकांची मागणी आहे; परंतु उन्हाळ्याच्या सुट्यांमुळे रक्तदानात घट झाल्याने रक्त आणि रक्तघटकांचा पुरवठा करण्यासाठी रक्तपेढीला मोठी कसरत करावी लागत आहे. 

रक्तदानाचे आवाहनरक्तपेढीत सध्या रक्ताचा तुटवडा आहे. रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी नागरिक, रक्तदान शिबीर संयोजकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. रक्तदान करून, रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे,असे आवाहन विभागीय रक्तपेढीच्या जनसंपर्क अधिकारी सुनीता बनकर यांनी केले आहे.

टॅग्स :govermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीdoctorडॉक्टरmedicinesऔषधं