शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

बजाजनगर खून प्रकरणातील अनोळखी महिलेची ओळख पटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:03 IST

: मृतदेह शवागृहात पडून : मृतदेह शवागारात पडून वाळूज महानगर : बजाजनगरात खून करून टाकलेल्या महिलेची चार दिवसांपासून अद्याप ...

: मृतदेह शवागृहात पडून

: मृतदेह शवागारात पडून

वाळूज महानगर : बजाजनगरात खून करून टाकलेल्या महिलेची चार दिवसांपासून अद्याप ओळख पटलेली नाही. त्यामुळे पोलिसांच्या तपासाला ब्रेक लागला असून त्या तो मृतदेह ओळख पटविण्यासाठी शासकीय रुग्णालयातील शवागारात पडून आहे.

बजाजनगरच्या एसटी कॉलनीत २ जून रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास अर्धनग्न व ओढणीने हात बांधलेल्या एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला. सदर महिला तीन महिन्याची गर्भवती असल्याची शवविच्छेदनातून समोर आले. गत चार दिवसापासून या मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम एमआयडीसी वाळूज पोलिसांच्यावतीने सुरू आहे. जिल्ह्यात तसेच परजिल्ह्यातील पोलीस ठाण्यात या महिलेचे वर्णन व छायाचित्रे पाठविली आहेत. बजाजनगरातील मुख्य चौक, रस्ते व औद्योगिक क्षेत्रातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी पोलिस यंत्रणेकडून करण्यात आलेली आहे. पेहरावावरून ही महिला परप्रांतीय असण्याची शक्यता वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.

त्यानंतरच उलगडणार खुनाचे रहस्य

या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी सोशल मीडिया व परिसरातील गावातून कुणी महिला बेपत्ता आहे का, याचा शोध घेतला जात आहे. आज-उद्यापर्यंत तिची ओळख न पटल्यास मृतदेह कुजण्याची शक्यता असल्याने अंत्यसंस्काराची प्रकिया पोलिसांना पार पाडावी लागणार आहे. ओळख पटल्यानंतरच तिच्या खुनाचे रहस्य उलगडण्याची शक्यता पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, सहायक पोलिस निरीक्षक गौतम वावळे यांनी वर्तविली आहे.

----------------------------