शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

ज्युरी मंडळ निवडणार आदर्श सरपंच : १० जानेवारीला औरंगाबाद जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 00:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : संपूर्ण राज्य आणि प्रत्येक गावाला उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’साठी राज्यभरातून भरभरून प्रतिसाद मिळाला. ...

ठळक मुद्देसरपंच अवॉर्ड : ५ हजार नामांकने

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : संपूर्ण राज्य आणि प्रत्येक गावाला उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’साठी राज्यभरातून भरभरून प्रतिसाद मिळाला. एकूण पाच हजार सरपंचांची नामांकने दाखल झाली आहेत. ‘लोकमत’चे प्रत्येक जिल्हा पातळीवरील ज्युरी मंडळ या नामांकनातून संबंधित जिल्ह्यातील आदर्श सरपंचांची निवड करणार आहे. लोकमत भवन, जालना रोड येथे १० जानेवारी रोजी बुधवारी सकाळी १० वाजता औरंगाबाद जिल्हा पातळीवरील सोहळा होणार आहे. त्यानंतर राज्यपातळीवरील सोहळा होईल.गावखेड्यांच्या बदलाची नोंद घेण्यासाठी गावच्या कारभाºयांना ‘बीकेटी टायर्स प्रस्तुत लोकमत सरपंच अवॉर्ड-२०१७’ या पुरस्काराने गौरविण्याचा निर्णय ‘लोकमत’ने घेतला आहे. गावाच्या विकासासाठी झटणाºया सरपंचांना वैयक्तिक पातळीवर गौरविणारा हा पहिलाच पुरस्कार आहे.‘पतंजली आयुर्वेद’ हे या उपक्रमाचे प्रायोजक तर ‘महिंद्रा ट्रॅक्टर्स’ हे सहप्रायोजक आहेत. पहिल्याच वर्षी या पुरस्कारांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. अवघ्या अठरा जिल्ह्यांतून पाच हजार सरपंचांनी नामांकने दाखल झाली आहेत. त्यामुळे पुरस्कारांबाबत प्रचंड चुरस आणि उत्सुकता निर्माण झाली आहे.सरपंचांनी गावातील जल, वीज, व्यवस्थापन, शिक्षण, स्वच्छता, आरोग्य, पायाभूत सेवा, ग्रामरक्षण, पर्यावरण, प्रशासन-लोकसहभाग, रोजगार, कृषी या अकरा विभागांत केलेल्या कामांची पाहणी करून या प्रत्येक विभागासाठी पुरस्कार दिला जाणार आहे. याशिवाय ‘उदयोन्मुख नेतृत्व’ व सर्वांगीण काम करणाºया सरपंचासाठी ‘सरपंच आॅफ द ईअर’ असे दोन स्वतंत्र पुरस्कार आहेत. एकूण तेरा पुरस्कार या सोहळ्यामध्ये दिले जाणार आहेत.सुरुवातीला जिल्हा पातळीवर हे पुरस्कार दिले जातील. त्यानंतर या विजेत्यांचे राज्यपातळीसाठी नामांकन होईल. त्यातून राज्यातील आदर्श सरपंच ठरतील. राज्यात कोण आदर्श ठरणार याची ग्रामीण महाराष्ट्राला प्रचंड उत्सुकता आहे. जिल्हास्तरावरील पुरस्कारांची निवड करण्यासाठी ‘लोकमत’ने समाजातील तज्ज्ञ व्यक्तींचे निरपेक्ष ज्युरी मंडळ स्थापन केले आहे. या ज्युरींमार्फत प्रत्येक नामांकनाची छाननी होऊन विजेत्यांवर मोहोर उमटविली जाईल. त्यामुळे विजेते कोण राहणार? हे सोहळ्यातच स्पष्ट होणार आहे. राज्यासाठीही स्वतंत्र्य ज्युरी मंडळ असेल.पुरस्कारांसाठीचे जिल्हेअकोला, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, औरंगाबाद, लातूर, रायगड, अहमदनगर, धुळे, जळगाव, नाशिक, जालना, कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, या जिल्ह्यांत यावर्षी हे पुरस्कार सुरू करण्यात आले आहेत.सोहळ्यात होणार मंथनसरपंच अवॉर्डच्या जिल्हा पातळीवरील सोहळ्यास मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. ग्रामविकास व पंचायतराजबाबत महत्त्वपूर्ण मंथन या सोहळ्यात होणार आहे. जिल्हाभरातून सरपंच या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.जिल्ह्यातून २४६ नामांकनेया पुरस्कार योजनेत औरंगाबाद जिल्ह्यातून २४६ नामांकने दाखल झाली. यामध्ये नामवंत ग्रामपंचायतींसह दुर्गम भागातील सरपंचाच्या नामांकनाचाही सहभाग आहे. यानिमित्ताने अनेक नवख्या गावाच्या यशोगाथाही समोर येणार आहेत.पार्लमेंट ते पंचायत४‘लोकमत’ने आदर्श खासदारांना गौरविण्यासाठी पार्लमेंटरी अवॉर्ड सुरू केले आहेत. अशा प्रकारचा पुरस्कार सुरू करणारा ‘लोकमत’ पहिला माध्यम समूह ठरला आहे. संसद ते गाव हा प्रवास करीत ‘लोकमत’ आता सरपंचांनाही गौरवीत आहे. राज्यातील जनतेने या पुरस्काराचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले आहे.......‘लोकमत’ नेहमीच प्रयत्नपूर्वक अभिनव आणि प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आघाडीवर राहिला आहे. यापूर्वी ‘लोकमत’ने विधिमंडळापासून ते देशाचे सर्वोच्च कायदेमंडळ असणाºया पार्लमेंटरी सदस्यांचा गौरव केला आहे. तळागाळातील व्यक्तींच्या आदर्श कार्याला ओळखून लोकशाहीला बळकटी देण्यासाठीच ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आपले गाव हाच आपला अभिमान आहे आणि इथेच आमची लोकशाही मूल्ये सर्वात महत्त्वाची असली पाहिजेत. जय हिंद!-विजय दर्डा, चेअरमन,एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह