शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कच-यावर प्रक्रिया करण्याचा विचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 00:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : नारेगाव येथील कचरा डेपो हलविण्याच्या मुद्याबाबत प्रशासकीय यंत्रणा गांभीर्याने विचार करू लागली आहे. नारेगाव ...

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : नारेगाव येथील कचरा डेपो हलविण्याच्या मुद्याबाबत प्रशासकीय यंत्रणा गांभीर्याने विचार करू लागली आहे. नारेगाव येथील कच-यावर प्रक्रिया करण्याबाबत आणि वॉर्डनिहाय डम्पिंग ग्राऊंडचा पर्याय सोमवारी झालेल्या बैठकीत चर्चेला आला.विभागीय आयुक्तालयात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महापौर नंदकुमार घोडेले, विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर, मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली.नवी मुंबई मनपातील अधिकाºयांचे शिष्टमंडळ या बैठकीला उपस्थित होते. तेथील कचºयाची समस्या, डम्पिंग गाऊंड, ओला व सुका कच-याच्या विल्हेवाटीसाठी वापरण्यात येणा-या बॅग्सबाबत त्या बैठकीत मंथन झाले. नवी मुंबई येथील कचºयाचे व्यवस्थापन पाहण्यासाठी व तेथील प्रकल्प समजून घेण्यासाठी मनपाचे शिष्टमंडळ तिकडे जाणार आहे. विधानसभा अध्यक्षांनी नवी मुंबईतील प्रयोगाबाबत सर्व माहिती जाणून घेतली. तसेच स्मार्ट सिटीमध्ये ४६ कोटी रुपयांची तरतूद कचरा व्यवस्थापनासाठी आहे, त्याचा उपयोग यासाठी करण्यात येण्यावर बैठकीत चर्चा झाली.विभागीय आयुक्त डॉ.भापकर म्हणाले, कचरा व्यवस्थापन ही सर्वांचीच जबाबदारी आहे. १० लाख मेट्रिक टन कचरा नारेगावमधील डेपोमध्ये जमिनीत शास्त्रशुद्धरीत्या पुरला. यापुढे जास्तीचा कचरा तेथे सॅण्डफिल करणे शक्य नाही. मनपाला याबाबत निर्णय घ्यावा लागेल. कचरा डेपोसाठी पर्यायी जागा पालिकेला शोधून देण्यापर्यंत प्रशासनाची भूमिका आहे.