शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कामकाज आयएएस अधिकारीच पाहणार

By admin | Updated: October 5, 2016 01:13 IST

औरंगाबाद : औरंगाबाद व कल्याण प्रादेशिक संचालक कार्यालयात भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी कामकाज पाहणार आहेत

औरंगाबाद : औरंगाबाद व कल्याण प्रादेशिक संचालक कार्यालयात भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी कामकाज पाहणार आहेत. राज्यात दोन कोटी ५० लाख वीज ग्राहक असलेली आशिया खंडातील सर्वात मोठी महाराष्ट्र राज्य वीज कंपनी आहे. कंपनीने कल्याण, पुणे, औरंगाबाद व नागपूर असे चार प्रादेशिक कार्यालयांची निर्मिती केली आहे. औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत औरंगाबाद, जळगाव, नांदेड व लातूर परिमंडळांचा समावेश आहे. यात प्रादेशिक कार्यालयांतर्गत ४६ लाख वीज ग्राहकांचा समावेश असून १९,४९८ कर्मचारी सेवा देणार आहेत. प्रादेशिक कार्यालयासाठी १ कोटी ७६ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. अधिकाऱ्याची नियुक्ती होईपर्यंत प्रभारी अधिकारी काम पाहतील. कार्यालयांना असणार हे अधिकारयापूर्वी प्रादेशिक कार्यालये स्थापन करण्यात आली होती. परंतु त्यांना फारसे निर्णय घेण्याचे अधिकार नसल्याने तो प्रयोग फसला होता. आता या प्रादेशिक कार्यालयास निविदा, बदली इत्यादी महत्त्वपूर्ण अधिकार देण्यात आलेले आहेत. कालपर्यंत हे अधिकार मुख्य कार्यालयास होते. धोरणात्मक निर्णयाचे अधिकार मुख्यालयाला असतील. राज्यात वीज दर, आकार वीज नियामक आयोग ठरवील. प्रादेशिक कार्यालयांतर्गत कायमस्वरूपी खंडित करण्यात आलेल्या वीज ग्राहकांच्या जोडण्या थकबाकी भरून घेऊन त्यांना कायम करणे. तसेच नवीन वीज जोडण्या देताना ग्रामपंचायत, नगरपालिका, नगर पंचायत, महानगरपालिकेची एनओसीसाठी न अडवता मागेल त्याला वीज जोडणी तात्काळ देणे.\ शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून प्रलंबित व नवीन वीज जोडण्या देणे, वीजचोरी थांबवून थकबाकी वसूल करणे आदी जबाबदाऱ्या प्रादेशिक कार्यालयावर आहेत. दिलेली वीज व त्या विजेचे पैसे वसुली यांचा ताळेबंद यांची जबाबदारीही त्यांच्यावर राहणार आहे. अकाऊंटबिलिटीमध्ये कार्यालय कमी पडले तर भविष्यात मोठे वीजसंकट या प्रादेशिक विभागावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.