शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

मैं अकेलाही चला था...लोग मिलते गये और कारवाँ बनता गया

By admin | Updated: January 6, 2017 00:29 IST

जालना : ‘मै अकेला ही चला था जनीबे मंजील- मगर लोग मिलते गये और कारवॉं बनता गया’ या प्रमाणे जालन्यातील मुशायरा व हिंदी व मराठी कवितांची परंपरा रौप्य महोत्सवात पोहचली.

जालना : ‘मै अकेला ही चला था जनीबे मंजील- मगर लोग मिलते गये और कारवॉं बनता गया’ या प्रमाणे जालन्यातील मुशायरा व हिंदी व मराठी कवितांची परंपरा रौप्य महोत्सवात पोहचली.जातीय सलोखा राष्ट्रीय एकात्मता कायम राखण्यासाठी येथील बज्म शमा-ए-अदब या संस्थेकडून गत २५ वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. याद्वारे मुशायरे व कवी संमेलनाचे आयोजन करून जनजागृती करण्याचे काम होत आहे. येथील सेवानिवृत्त अभियंता एम.एच. खान दुर्राणी हे जालना शहरातील उर्दू, हिंदी, मराठीचे नामांकित मान्यवर कवी, शायर यांच्या सहकार्याने जातीय सलोखा, प्रेम, आदर, सद्भावना व राष्ट्रीय एकात्मता अखंडता व भारतीय भाषांना उत्तजेन तसेच प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवितात. मुशायरा व हिंदी कवितांची जालनेकरांना मेजवाणी मिळावी म्हणून १० जानेवारी १९९२ रोजी बज्म शमा-ए-अदम, हिंदू मुस्लिम कौमी एकता राष्ट्रीय अखंडता- सदभावना सेवाभावी संस्थेची स्थापना केली. त्यानंतर सुरू झाले दर्जेदार व श्रवणीय अशा मुशायरा व कवितांचे कार्यक्रम. या कार्यक्रमांना जालनेकरांनी डोक्यावर घेतले. २५ वर्षांत तब्बल ३०० मुशायरे झाल्याचे दुर्राणी यांनी सांगितले. यात विविध जाती-धर्माचे लोक आनंदाने सहभागी होऊन आपले कविता, मुशायरे सादर करतात. त्रैभाषिक मुशायरे, कवी संमेलने, १५ आॅगस्ट, २६ जानेवारी, १ मे, दीपावली, ईद, ख्रिसमसनिमित्त मुशायराचे आयोजन करण्यात येते. मुशायरा व कवी संमेलनाची आठवण सांगताना दुर्राणी म्हणाले, ‘मै अकेला ही चलाथा जनीले मंजील- मगर लोग मिलते गये और काफिला बनता गया’ या प्रमाणे शेकडो मुशायरा व कविता सादर करण्यासाठी माझ्यासोबत जोडल्या गेले. जातीय सलोखा, राष्ट्रीय एकात्मता नांदावी म्हणून दुर्राणी यांनी ईद व त्यौहार की खुशीयाँ आओ मनाए हम मिलकर, कौमी एक जहेती और इन्सानियत की शान बढाये हम मिलकर, भारत देश नाम हुआ उँचा सारे देश मे जीस से हफिज, प्रेम अहिंसा की हरसू वो शमा जलाये हम मिलकर यासारख्या मुशायरातून जातीय सलोखा जपला.