शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

मला स्वतःचा तिरस्कार वाटायचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:02 IST

अभिनेत्री इलियाना डिक्रूजने बॉडी शेमिंग आणि सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगवर वक्तव्य केलं आहे. एका मुलाखतीमध्ये ती म्हणते, “असे दिवस ...

अभिनेत्री इलियाना डिक्रूजने बॉडी शेमिंग आणि सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगवर वक्तव्य केलं आहे. एका मुलाखतीमध्ये ती म्हणते, “असे दिवस होते, जेव्हा मी स्वत:ला आरशात बघितल्यानंतर मला स्वत:चा तिरस्कार वाटायचा. पण आता फरक इतकाच आहे की, मी आरशात स्वत:ला पाहण्यासाठी स्वत:मध्ये एक चांगली गोष्ट शोधून काढते, जी मला आवडते.” पुढे ती म्हणाली की, ‘‘जेव्हा आपण स्वत:ला जसे आहोत तसे स्वीकारतो तेव्हा हीच गोष्ट आपल्याला आणखी सुंदर बनवते. मला असं वाटतं की जे लोकं स्वत:चा स्वीकार करत नाहीत, त्या प्रत्येकाने हे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.”

नवा अल्बम म्हणजे माझ्या पत्नीला लिहिलेले प्रेमपत्र

निक जोनासचा ‘स्पेसमॅन’ हा त्याचा अल्बम लवकरच प्रदर्शित होणार आहे. एका मुलाखतीत याबद्दल तो म्हणतो, “स्पेसमॅन हे माझ्या पत्नीला लिहिलेलं प्रेमपत्र आहे. कारण ज्यावेळी मला असं वाटतं की, मी माझ्या भावना शब्दात व्यक्त करू शकत नाही, तेव्हा मी स्टुडिओत जातो आणि गाण्यातून त्या व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. माझ्याकडे ही गोष्ट आहे याचा मला आनंद आहे. कारण याच गोष्टीमुळे ती खूश असते आणि ते माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे.”. प्रियांका एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती त्यावेळी एकटा होता. आम्ही पुन्हा एकत्र आलो, त्यावेळी मला या अल्बमची थीम सापडली. भविष्याबद्दल आणि पुढचा उज्ज्वल दिवस पाहायला मिळेल, हा आशावाद अशी या अल्बमची थीम असल्याचे त्याने सांगितले.

यशचा मुलासोबतचा व्हिडीओ व्हायरल

दक्षिणात्य सुपरस्टार यशने ‘केजीएफ’ या चित्रपटातून सगळ्यांची मने जिंकली आहेत. नुकताच यशने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत यश त्याच्या मुलासोबत खेळताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये यशचा मुलगा त्याच्या गालावर मारतो आणि त्याला हसवण्यासाठी यश लगेच आवाज काढतो. वडील आणि मुलाचा हा मस्ती करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. दरम्यान, यशच्या ‘केजीएफ चॅप्टर २’ या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात यशसोबत अभिनेता संजय दत्त आणि अभिनेत्री रवीना टंडन दिसणार आहे.